क्षणाचं दुर्लक्ष अन् 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू , मुंबईतून हृदयद्रावक घटना समोर (फोटो सौजन्य-X)
Naigaon Accident News In Marathi : मुंबईतील नायगाव परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे.मुंबईनजीकच्या नायगावमधील एका सोयायटीत खेळताना चार वर्षांच्या चिमुकलीचा तोल गेल्याने १२ व्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बहिणीकडे गेलेल्या चिमुकलीला घरी घेऊन जाण्यासाठी आई आणि ती दोघंही बाहेर पडले.चिमुकली इकडे तिकडे धावत होती. आईनं प्रेमानं धपाटा दिला आणि तिला चप्पल स्टॅण्डवर बसवलं. तिचा चपला घेण्यासाठी ती खाली वाकली आणि दोन सेकंदासाठी पाठ झाली. चिमुकली पटकन चढली आणि खिडकीवर बसायला गेली, मात्र त्याचवेळी तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. ही धक्कादायक घटना मुंबईजवळच्या नायगावमध्ये घडली आहे.
आईच्या डोळ्यादेखत चिमुकली खाली कोसळली. १२ व्या मजल्यावरील पडून ४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आली. ही मुलगी आईसोबत बाहेर आली होती. यावेळी मुलगी गॅलरीत असलेल्या टेबलावर चढली. यानंतर मुलीचा तोल गेला आणि ती थेट इमारतीच्या खिडकीतून बाहेर पडली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेलं मात्र तिचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव पूर्वमध्ये ही धक्कादायक घटना घडली. नवकार फेस-१ ही १४ मजल्यांची सोसायटी आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. अनविका प्रजापती असं मृत्यू झालेल्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे.या घटनेने चिमुकलीच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून, तिच्या आई-वडिलांचा रडून रडून हाल बेहाल झाला आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी इमारतीच्या सुरक्षाव्यवस्थेचीही पाहणी केली.
दरम्यान या घटनेने उंच इमारतींमध्ये मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. पालकांनी मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
विरार नारंगी, वैतरणा या दरम्यान 22 जुलै रोजी, 12921 फ्लाइंग राणी ही ट्रेन व्हीआर आउटर आणि नारिंगी एलसी दरम्यान जात असताना, अज्ञात इसमाने एका दगडाने महिला कोचची खिडकीची काच फोडली. ही घटना सायंकाळी साडेसातच्या सुमाराची असल्याची रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे. ही दगडफेक का व कोणी केली हे अद्याप समजू शकले नाही.