नोकरीसाठी चक्क मंत्रालयात घेतल्या बोगस मुलाखती; नागपूरच्या भामट्याने 1.60 कोटी उकळले
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. हा शपथविधी सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. पण, यामध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला होता. असे असताना आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेदेखील वाचा : म्हणून एकनाथ शिंदेंनी फडणवीस, अजित पवारांसोबत जाणं टाळलं; या नेत्याने सांगितलं खरं कारण
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (दि.16) नागपुरात सुरू होणार आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील नव्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना गृहमंत्रालयाची मागणी सोडायला तयार नाही. तर भाजप त्यांना गृहमंत्रालयाऐवजी नगरविकास खाते देण्यास तयार आहे. असे असताना आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
येत्या 14 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. बुधवारी रात्री अमित शहांसोबतच्या बैठकीत महायुतीने मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी तारीख निश्चित केली आहे. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना कोणकोणती खाते मिळणार यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.
शिवसेनेला ना गृहखातं, ना महसूल खातं?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गृहखाते, महसूल खाते दिले जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास मंत्रालय देण्यात येईल. यासोबतच भाजप स्वत:कडे 20 मंत्रिपद ठेवू शकते. तर शिंदे गटाला 12 आणि अजित पवार गटाला 10 मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारमंथन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी पोहोचले. या बैठकीत नवे मंत्रिमंडळ कसे असेल, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे.
शपथविधीनंतर होणार होता विस्तार, पण…
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. यानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शपथविधी सोहळ्याला एक आठवडा उलटल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यातच सध्या महायुतीत रात्री-मध्यरात्री अनेक बैठका पार पडताना दिसत आहेत.
हेदेखील वाचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘या’ भूमिकेमुळे रखडला मंत्रिमंडळ विस्तार; दिल्ली दरबारातही सहमती नाहीच !