मंगल प्रभात लोढा (फोटो- ट्विटर)
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील तळागाळातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञान-आधारित प्रभावी उपाय शोधणे यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांचा सहभाग वाढविणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात,विशेषतः शैक्षणिक संस्था आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी व संभाव्य उद्योजकांपर्यंत पोहोचून त्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “राज्यातील तरुणांमधील नाविन्यपूर्ण विचार आणि स्टार्टअप्सना योग्य दिशा देण्याचे काम या कराराच्या माध्यमातून होईल.
पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार
ग्रामीण व निम-शहरी भागातील गुणवान तरुणांना एकत्र आणून त्यांना उद्योग जगताशी जोडणे आणि त्यांच्या कल्पकतेला व्यावसायिक रूप देण्याचे आमचे धोरण आहे. या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजकता परिसंस्थेला आणखी बळकटी मिळेल.राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे, आयटीआय आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ बद्दल माहिती देणे. निवडक नवोन्मेषक व स्टार्टअप्सना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, तांत्रिक साहाय्य आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे. युवकांना केवळ रोजगारापुरते मर्यादित न ठेवता त्यांना सक्षम उद्योजक म्हणून घडवणे.या सामंजस्य करारामुळे राज्यातील शाश्वत विकास, नवोपक्रम आणि रोजगार निर्मितीच्या प्रवासाला अधिक वेग येईल, असा त्यांनी विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’च्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकतेला चालना देणार – अध्यक्ष रविंद्र माणगावे
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेले गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिलचे अध्यक्ष रविंद्र माणगावे म्हणाले की, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर ( MACCIA) अंतर्गत कार्यरत असलेली गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल (GTUIC) हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात युवांना आणि महिलांना रोजगार मागणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करणारे हा उपक्रम आहे.
आज मंत्रालय येथे ‘गाव तेथे उद्योजक’ या संकल्पनेअंतर्गत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये ग्रामीण भागातील सहभाग वाढवा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA) यांच्या प्रतिनिधींसोबत सामंजस्य करार करण्यात आला. उद्योजक घडविण्यासाठी MACCIA करत असलेल्या कार्याच्या माध्यमातून हा उपक्रम गावागावांत पोहोचण्यास मदत होईल. स्थानिक समस्यांवर नव्या दृष्टिकोनातून विचार करून उपाय शोधण्याचे सामर्थ्य ग्रामीण महाराष्ट्रातील युवकांमध्ये आणि नवउद्योजकांमध्ये आहे. त्यांच्या या सामर्थ्याला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’च्या माध्यमातून वाव मिळावा, तसेच त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व पाठबळ मिळावे, यासाठी हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरेल. #SevaFirstInnovationChallenge #सेवाFirst #MACCIA #InnovationChallenge #MPLodha — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) October 21, 2026
ग्रामीण भागात अनेक युवक, महिला आणि स्थानिक कारागीर यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्याची क्षमता व कल्पना असतात मात्र, योग्य मार्गदर्शन, भांडवल, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि शासकीय योजनांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायवाढीला मर्यादा येतात. ही दरी भरून काढण्यासाठी गावपातळीपासून जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत संस्था काम करीत आहे.राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने जिल्हास्तरीय उद्योग विषयक मार्गदर्शन व प्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी ही संस्था काम करत आहे अशी संस्थेची माहिती दिली. ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’स्पर्धेसाठी जास्तीत जास्त सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा
यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा,रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगूरु डॉ.अपुर्वा पालकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेले गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिलचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी करारावर स्वाक्षरी केली. आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, शिवाजी मानकर, शिखर जैन, रामेश्वर पवार, सुरेश घोरपडे, अण्णासाहेब पाटील, दिवाकर केसकर, ॲड. रिचा पाठक,अक्षता भांबळे,विशाल बंडगर, जितु चव्हाण यावेळी उपस्थित होते.






