Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा रिलायन्सशी तब्बल 3 लाख कोटींचा ऐतिहासिक करार

अनंत अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताच्या उभारणीतील परिवर्तनकारी प्रयत्नांबद्दल कौतुक केले. रिलायन्स इंडस्ट्रीज नवीन भारताच्या उभारणीत योगदान देण्यास वचनबद्ध आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 23, 2025 | 07:22 AM
दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा रिलायन्सशी तब्बल 3 लाख कोटींचा करार

दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा रिलायन्सशी तब्बल 3 लाख कोटींचा करार

Follow Us
Close
Follow Us:

दावोस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यात सुमारे 3 लाख 5 हजार कोटी रुपयांचा बुधवारी ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. या गुंतवणुकीच्या माध्यमातून रिलायन्सचे अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली नवीन ऊर्जा, किरकोळ विक्री, आतिथ्य आणि उच्च तंत्रज्ञान, उत्पादन यासह विविध क्षेत्रांमध्ये तीन लाखांहून अधिक रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रासाठी एक अभूतपूर्व क्षण असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेदेखील वाचा : Jalgaon Railway Accident : ‘घटना अतिशय वेदनादायी’; जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

अनंत अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताच्या उभारणीतील परिवर्तनकारी प्रयत्नांबद्दल कौतुक केले. रिलायन्स इंडस्ट्रीज नवीन भारताच्या उभारणीत योगदान देण्यास वचनबद्ध आहे. भारताच्या 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने योगदान आणि महाराष्ट्राला पहिली ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे अनंत अंबानी यांनी कौतुक केले. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या या ऐतिहासिक गुंतवणुकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनंत अंबानी यांचे आभार मानले.

ह्युंदाई मोटर्ससोबत महत्वपूर्ण बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंदाई मोटर ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष इल बम किम यांच्याशी बुधवारी दावोसमध्ये एक अभ्यासपूर्ण बैठक घेतली. या चर्चेत ह्युंदाईने भारतासाठी उत्पादने कस्टमायझ करण्यावर भर दिला आहे. या ऑक्टोबरपासून मेड इन महाराष्ट्र कार लाँच करण्याच्या त्यांच्या योजनांवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्र्यांनी ह्युंदाईच्या यशस्वी आयपीओचे अभिनंदन केले. पुण्यात त्यांच्या नवीन प्लांटच्या स्थापनेचे स्वागत केले. किम यांनी महाराष्ट्र सरकारसोबत अर्थपूर्ण सीएसआर उपक्रमांमध्ये सहकार्य करण्यास उत्सुकता दर्शविली, ज्यामुळे राज्यासोबतच्या भागीदारीत आणखी एक मैलाचा दगड ठरेल.

हेदेखील वाचा : Anjali Damania : अंजली दमानियांच्या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण?

Web Title: Maharashtra government signs historic deal worth rs 3 lakh crore with reliance in davos nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 07:14 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Amravati News: “आधीही भाजप अन् आताही…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
1

Amravati News: “आधीही भाजप अन् आताही…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Politics: “जोपर्यंत देवाभाऊ आहे तोवर…”; जालन्यातून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर सडकून टीका
2

Maharashtra Politics: “जोपर्यंत देवाभाऊ आहे तोवर…”; जालन्यातून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर सडकून टीका

CM Devendra Fadnavis यांची ठाकरे बंधूंच्या वचननामावर जोरदार टीका; म्हणाले, “जनाची नाही तर मनाची तरी…”
3

CM Devendra Fadnavis यांची ठाकरे बंधूंच्या वचननामावर जोरदार टीका; म्हणाले, “जनाची नाही तर मनाची तरी…”

“गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?
4

“गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.