'या' मार्गावरील लोकल रद्द तर काही विलंबाने, वाचा मुंबई लोकलसंदर्भातील महत्त्वाची बातमी (फोटो सौजन्य-X)
Mumbai Local News Marathi : मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या (15 डिसेंबर) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आणि अभियांत्रिकी कामांसाठी घेण्यात येणार आहे. परिणामी ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द होतात तर काही लोकल विलंबाने धावतात. तसेच अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन होईल आणि काही सेवा रद्द होतील. प्रवाशांनी प्रवास करताना काळजी घ्यावी आणि रेल्वेच्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
रविवारी 15 डिसेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांमध्ये मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे अप (मुंबईच्या दिशेला येणाऱ्या) मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान
कधी : सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत अप मार्गावरील मेल/एक्सप्रेस ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. एलटीटीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर वळविण्यात येतील.
हार्बर मार्ग
कुठे : पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्गिका वगळून) अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधी सीएसएमटी-पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द राहतील. पनवेल-ठाणे अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी विभागात विशेष लोकल धावतील. ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असतील. बेलापूर/नेरूळ ते उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका सेवा उपलब्ध असणार आहेत.
पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येतील. तसेच अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील. अंधेरी आणि बोरिवलीच्या काही लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणत्याही लोकल चालवण्यात येणार नाही.
गाडी क्रमांक ११०१० पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक १२१२४ पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
ट्रेन क्र. १३२०१ पाटणा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक १७२२१ काकीनाडा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक १२१२६ पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
गाडी क्रमांक १२१४० नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक २२२२६ सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वळण
खालील डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्या विहार स्थानकावरील डाऊन एक्सप्रेसकडे वळवण्यात येतील आणि ठाणे येथे 5व्या एक्सप्रेसकडे वळवण्यात येतील आणि त्या गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
ट्रेन क्रमांक ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर पवन एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
अप आणि डाऊन हार्बर मार्ग (पोर्ट लाईन वगळता) पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 04.05 पर्यंत.