Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Railway : वांद्रे स्टेशन की कचराकुंडी? कचरा, अतिक्रमण दाखवणारा विदेशी पर्यटकाचा Video Viral

परदेशी पर्यटकांनी सोशल मीडियावर काही रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छतेचे आणि रस्त्यांजवळील अतिक्रमणाचे व्हिडिओ शेअर केल्यामुळे भारतीय रेल्वे व्यवस्थेबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 25, 2026 | 11:33 AM
वांद्रे स्टेशन की कचराकुंडी? कचरा, अतिक्रमण दाखवणारा विदेशी पर्यटकाचा Video Viral

वांद्रे स्टेशन की कचराकुंडी? कचरा, अतिक्रमण दाखवणारा विदेशी पर्यटकाचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वांद्रे स्टेशन की कचराकुंडी
  • कचरा, अतिक्रमण दाखवणारा विदेशी पर्यटकाचा Video Viral
  • रील्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल
कौस्तुभ खातू,मुंबई : आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्ड कपमुळे विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक मुंबईसह विविध शहरांत दाखल झाले आहेत. मात्र, मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छता आणि रुळांजवळील अतिक्रमणाचे व्हिडिओ परदेशी पर्यटकांनी सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत असल्याची शेअर केल्याने भारतीय रेल्वे व्यवस्थेची चर्चा सुरू झाली आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या रुळांजवळ मोठ्या प्रमाणात उभारलेली झोपडपट्टी, प्लॅटफॉर्मवरील, कचऱ्याचे ढीग आणि रुळांजवळ साचलेली घाण याची दृश्ये काही पर्यटकांनी मोबाईलमध्ये चित्रित केली आहेत. ही रील्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून मुंबईच्या सार्वजनिक व्यवस्थेवर टीका होत आहे.

109 वर्षांआधी आज्जाने इंग्रजांना दिलं होत 35 हजारांच कर्ज, आता करोडोंहून अधिक झाली किंमत… नातवाने पाठवली रीतसर नोटीस

मेल-एक्सप्रेस गाड्यांतील प्रश्न केले उपस्थित

परदेशी पर्यटकांनी केवळ स्थानकांवरील कचरा आणि अतिक्रमणच नव्हे, तर धावत्या मेल एक्सप्रेस गाड्यांतील परिस्थितीवरही लक्ष वेधले आहे. काही विदेशी पर्यटकांनी रेल्वे गाड्यांतील प्रचंड गर्दी, अस्वच्छता आणि डब्यांच्या मूलभूत देखभालीवर टीका केली आहे. काही व्हिडिओमध्ये मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी उभे असल्याचे दिसते. तसेच काही ठिकाणी शौचालयांची अस्वच्छता, डब्यामध्ये साचलेला कचरा आणि इतर मूलभूत सुविधांच्या देखभालीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

मुंबईतील स्थानकांवरील अस्वच्छतेबाबत चिंता

रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छता आणि अतिक्रमणाचे दृश्य दाखवणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. या व्हिडिओंना हजारो लाईक्स मिळाले असून, अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काही सोशल मीडिया वापरकत्यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली, तर काहींनी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. काही भारतीय वापरकत्यांनी रेल्वेवरील प्रचंड प्रवासी ताण आणि शहरातील वाढती लोकसंख्या यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीचाही उल्लेख केला आहे.

‘जुनस राथाला’ या परदेशी पर्यटकाने सदर व्हिडिओ प्रसारित केला असून, यात त्याने ‘मी सध्या एका भारतीय रेल्वे स्थानकावर माझ्या ट्रेनची वाट पाहत आहे. मात्र, आजूबाजूचा परिसर पाहून धक्का बसतो आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. हे रेल्वे स्टेशन आहे की कचराकुंडी, असा प्रश्न पडतो. आणि हे देशातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक असलेल्या मुंबईतील स्थानक आहे, ही गोष्ट अधिकच धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. वांद्रे स्थानक परिसरातील अतिक्रमण 66 आणि स्वच्छतेचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. मात्र, परदेशी पर्यटकांच्या रील्समुळे हा विषय आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरातील स्वच्छता आणि अतिक्रमण हटविण्याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे, अशी माहिती रहिवासी, वांद्रे गणेश गायकवाड यांनी दिली.

याला म्हणतात रॉयल डिलिव्हरी! पाठीवर ब्लिंकिंटची बॅग अन् घोड्यावर बसून ताऊ करू लागले डिलिव्हरी; मजेदार Video Viral

Web Title: Mumbai railway station cleanliness issue bandra encroachment viral video icc t20 world cup foreign tourists criticism news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai Local
  • railway

संबंधित बातम्या

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…
1

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…

Jalna Crime News: भररस्त्यात बस अडवून तरुणीला ओढण्याचा प्रयत्न; विरोध करणाऱ्या चालकाला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद!
2

Jalna Crime News: भररस्त्यात बस अडवून तरुणीला ओढण्याचा प्रयत्न; विरोध करणाऱ्या चालकाला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद!

Mumbai Gaming Zone : मुंबईतील सर्व मॉलमधील गेमिंग झोनची सुरक्षा तपासणार सरकार; मोठ्या घटनेनंतर महत्त्वाचा निर्णय
3

Mumbai Gaming Zone : मुंबईतील सर्व मॉलमधील गेमिंग झोनची सुरक्षा तपासणार सरकार; मोठ्या घटनेनंतर महत्त्वाचा निर्णय

TV Actor Arrested: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला POCSO अंतर्गत अटक
4

TV Actor Arrested: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला POCSO अंतर्गत अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.