Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhada News: म्हाडाने जाहीर केलेली ‘अभय’ योजना काय आहे? किती असणार मुदत? जाणून घ्या सविस्तर

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मुंबई क्षेत्रामध्ये गृहनिर्माण योजना राबविल्या जातात. मुंबई मंडळाच्या मुंबईत एकूण ११४ अभिन्यासाअंतर्गत सुमारे २.२५ लाख सदनिका उपलब्ध आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 06, 2025 | 07:49 PM
Mhada News: म्हाडाने जाहीर केलेली 'अभय' योजना काय आहे? किती असणार मुदत? जाणून घ्या सविस्तर

Mhada News: म्हाडाने जाहीर केलेली 'अभय' योजना काय आहे? किती असणार मुदत? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा मुंबई मंडळाच्या अभिन्यासातील भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या गृहनिर्माण संस्थांकरिता भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी म्हाडातर्फे विशेष अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या अभय योजनेचा सुमारे ८० गृहनिर्माण संस्थांना लाभ मिळणार आहे. ही योजना १० एप्रिल २०२५ पर्यंत या मर्यादित कालावधीपर्यंत लागू राहणार आहे.

दिनांक ८ ऑक्टोबर, २०२४ रोजी शासनाच्या मंजुरीनुसार मुंबई मंडळामार्फत अधिमूल्य (premium) फरकाच्या रकमेवरील व्याज माफीकरिता अभय योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या गृहनिर्माण संस्थांना अधिमूल्य फरकाच्या रकमेवर व्याज आकारण्यात आले आहे, त्यांना या योजनेअंतर्गत व्याज माफ करण्यात आले असून त्यांना केवळ मूळ अधिमूल्य फरकाच्या रकमेचा भरणा करावा लागणार आहे. तसेच दुसर्‍या अभय योजनेअंतर्गत म्हाडाच्या इमारत परवानगी कक्षामार्फत विकास नियंत्रण नियमावली (विनिनि) १९९१ अंतर्गत पुनर्विकास करण्यात आलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी ही अभय योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेन्वये प्रचलित धोरणानुसार पुनर्विकसित इमारतींवर आकारण्यात येणार्‍या दंडात्मक शुल्काच्या रकमेवर सवलत देण्यात येणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मुंबई क्षेत्रामध्ये गृहनिर्माण योजना राबविल्या जातात. मुंबई मंडळाच्या मुंबईत एकूण ११४ अभिन्यासाअंतर्गत सुमारे २.२५ लाख सदनिका उपलब्ध आहेत. या ११४ अभिन्यासातील ५६ वसाहती अत्यंत जुन्या असून त्यांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या सन २००७ मधील ठरावानुसार २९ जुलै, २००४ ते ४ जून, २००७ या कालावधीमध्ये देकारपत्र / ना-हरकत प्रमाण पत्र देण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थाना पुनर्विकास प्रकल्पात अधिमूल्य फरकाची रक्कम वसूल करून घ्यावयाची आहे. त्यानुसार संबंधित गृहनिर्माण संस्थांना वसुलीपत्र देण्यात आले होते पण बर्‍याच संस्थांनी अधिमूल्य फरकाच्या रकमेचा भरणा न केल्यामुळे त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले नाही.

हेही वाचा: Mhada Lottery 2024: मुंबईकरांसाठी खूशखबर! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

परिणामतः संस्थेतील सभासदांना जल आकार, मालमत्ता कर इत्यादींचा वाढीव दराने भरणा करावा लागत आहे. तसेच सदनिका खरेदी-विक्री करताना देखील सभासदांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्या विकासकांनी पुनर्विकासाचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण करून इमारत गृहनिर्माण संस्थेकडे हस्तांतरित केल्या आहेत त्यामुळे अधिमूल्य फरकाच्या रकमेचा भार संस्थेवर व परिणामतः संस्थेतील सभासदांना सोसावा लागत आहे. या अडचणी समोर ठेवत या गृहनिर्माण संस्थांना अधिमुल्य फरकाच्या रकमेवरील व्याज माफ करण्यात आले असून त्यांना केवळ मूळ अधिमूल्य फरकाच्या रकमेचा भरणा करावा लागणार आहे

तसेच दुसर्‍या अभय योजनेअंतर्गत म्हाडाच्या इमारत परवानगी कक्षामार्फत विकास नियंत्रण नियमावली १९९१ अंतर्गत पुनर्विकास केलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याकरिता ही योजना लागू करण्यात आली आहे. ज्या गृहनिर्माण संस्थाना ७ जानेवारी, १९१२ ते १२ नोव्हेंबर, २०१८ या कालावधीत विनिनि १९९१ नुसार बांधकाम परवानगी मिळाली आहे, त्या संस्थांकरिता ही योजना लागू राहील. यामध्ये भोगवटा प्रमाणपत्र म्हाडाने दिलेल्या भूखंड क्षेत्रफळानुसार दिले जाईल. तसेच बंद फ्लॉवर बेड, बाल्कनी प्रत्येक सदनिकेमागे सूचीबद्ध करण्यात आले आहे. संस्थेच्या इमारतीतील अनधिकृत वापराबाबतच्या प्रचलित धोरणांनुसार आकारण्यात येणार्‍या दंडात्मक शुल्काच्या रकमेच्या ७५ टक्के रकमेकरिता अभय योजने अंतर्गत सवलत देण्यात येत आहे.

हेही वाचा: MHADA: घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट! म्हाडा पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार

सुधारित नकाशे/ बांधकाम परवानगीच्या पलीकडे इमारत बांधकाम झालेले असल्यास प्रचलित धोरणानुसार आकारण्यात येणार्‍या दंडात्मक शुल्काच्या ७५ टक्के रकमेकरिता अभय योजने अंतर्गत सवलत देण्यात येणार आहे. या अभय योजनेअंतर्गत सुधारित नकाशे/ बांधकाम परवानगीचे शुल्क आणि त्यावरील दंडात्मक शुल्क यांची आकारणी केली जाणार आहे.

सदर अभय योजनांचा तपशील म्हाडाच्या https://mhada.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा अभिन्यासातील भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या सर्व संस्थांना आवाहन करण्यात येते की, अभय योजनांचा लाभ घेऊन आपल्या संस्थेच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.

Web Title: Mhada mumbai board pending occupancy certificate for housing societies mhada launch abhay scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • MHADA Houses
  • Mumbai

संबंधित बातम्या

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
1

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
2

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
3

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.