ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भूमिगत भुयारी प्रकल्प कधी सुरू होणार (फोटो सौजन्य-X)
Orange Gate-Marine Drive Tunnel News Marathi: मुंबईच्या वाहतूक या पायाभूत सुविधांचा कायापालट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत भुयारी मार्गासाठी यशस्वीरित्या आर्थिक नियोजन केले आहे. ज्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या लार्ज कॉर्पोरेट शाखा, मुंबई यांनी ७३२६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. हे एमएमआरडीएची मजबूत आर्थिक विश्वासार्हता तसेच जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवण्याच्या वचनबद्धतेची प्रचिती देते.
६.२३ किमी लांबीच्या या बोगद्यासाठी एका महाकाय टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) चा वापर केला जाईल. बोगद्याचा व्यास ११ मीटर असेल. हा बोगदा जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे १५ ते २० मीटर खाली असेल. अशा परिस्थितीत, बोगदा खोदण्याचे काम जमिनीखालून सुरू होईल. टीबीएम लाँचिंग शाफ्टद्वारे जमिनीत खाली आणले जाते.
बोगद्यात दोन लेन बांधल्या जातील. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बोगद्यामध्ये १-१ लेनचा अतिरिक्त पर्यायी मार्ग देखील असेल. ईस्टर्न फ्रीवेला बोगद्याशी जोडण्यासाठी, विद्यमान फ्रीवेजवळ एक व्हायाडक्ट आणि ओपन कट मार्ग बांधला जाईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, ठाणे, कल्याण, भिवंडी, चेंबूर येथून दक्षिण मुंबई किंवा उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांना सिग्नल मुक्त मार्ग उपलब्ध होईल.
९.२ किमी लांबीचा भूमिगत भुयारी कोस्टल रोड जो अखंडपणे ऑरेंज गेट (ईस्टर्न फ्रीवे) ते मरीन ड्राइव्ह कोस्टल रोडला जोडला जाईल.
६.५२ किमी दुहेरी-बोगदा प्रणाली विशेष आपत्कालीन लेनसह, ज्यामुळे अजून सुरक्षा वाढेल.
पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी मजबूत करणे तसेच दक्षिण मुंबईसाठी रिंग रूट तयार करणे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करून मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासात एक नवीन पर्व सुरू केले आहे. या ऐतिहासिक क्षणी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार आधी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठाणे, चेंबूरहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना एकेरी मार्गमुक्त मार्ग देण्यासाठी, ९.२३ किमी लांबीचा मार्ग बांधला जात आहे. ज्यापैकी सुमारे ६.२३ किमी मार्ग भूमिगत असेल. ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्प कोस्टल रोड आणि ईस्टर्न फ्रीवेला थेट जोडेल. प्रकल्पाच्या कास्टिंग यार्डसाठी सुमारे ८ हेक्टर जमीन लागेल. बीपीटी यासाठी जमीन देण्यासही तयार आहे.
एमएमआरडीएच्या मते, हा बोगदा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, दक्षिण मुंबईची वाहतूक थेट ट्रान्सहार्बर लिंकशी जोडली जाईल. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल. मुंबईतील या महत्त्वाच्या प्रकल्पाचे बांधकाम सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
– कॉरिडॉरचा खर्च ७,७६५ कोटी रुपये आहे.
-प्रकल्पाची एकूण लांबी अंदाजे ९.२३ किमी आहे.
-६.२३ किमीचा भूमिगत बोगदा असेल.
-बीपीटी १.९६ हेक्टर जमीन देण्यास तयार
– कास्टिंग यार्डसाठी ८ हेक्टर जमीन आवश्यक आहे.