'साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार', संजय राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?
मुंबई : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले असून यावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार असून त्याला अद्याप पकडण्यामध्ये यश आलेले नाही. यावरुन आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसेच मुंडे-धस भेटीवरुन देखील राजकारण सुरु आहे. या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “डिल झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले ज्या वेगाने ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले गेले ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद आणि पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला. मुंडे भेटीवर त्यांनी धसांचा चांगलाच समाचार घेतला. आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो. आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचा भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं,” असा घणाघाती आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार राऊत म्हणाले की, “मला एका प्रमुख माणसाने सांगितलं सुरेश धस मागार घेतील, त्यांची ती परंपरा आहे. एखाद मोठा डील पदरात पाडून घेतील आणि ते नंतर शांत बसतील. एक फार मोठं डील झालं आहे. या संदर्भात जे लढ्यात उतरले आहेत, सुप्रिया सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अंजली दमानिया असतील, त्यांच्याशी या विषयावर बोलेन. बावनकुळे त्यांचे बॉस आहेत, असे ते म्हणतात. देवेंद्र फडणवीस देखील त्यांचे बॉस आहेत. मग त्यांच्या बॉसने त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का इतकं मोठं प्रकरण सुरू असताना? त्यांनी या विषयावर कोणाला भेटणं जावो हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहे. ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्याने तिकडून बैठकीतून बाहेर पडले पाहिजे याला नैतिकता म्हणतात. आणि सांगायला पाहिजे बाहेर येऊन माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झाला आणि मला ट्रॅप मध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो हिंमत आहे का सांगायची,” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट माणुसकीपोटी ते आजारी असल्यामुळे घेतल्याचे स्पष्टीकरण दिले होते. याबाबत ते म्हणाले की, “संवाद राजकारणात असला पाहिजे. पण गुन्हेगारांशी असावा का? ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांचा राजीनामा मागितला जातो खूणाच्या प्रकरणात त्यांच्याशी संवाद ठेवावा असं कोणाचं म्हणणं असेल तर महाराष्ट्रात प्रत्येक राजकारण्यांना गुन्हेगारांशी संवाद साधावा लागेल. हे टोलवाटोलवी करत आहेत, या कोर्टातून त्या कोर्टावर टाकत आहेत. आम्ही लवकरच शिवसेनेचे सर्व नेते बीडला जाणार आहोत. त्यानंतर आम्ही तिकडे गेल्यावर उद्धव ठाकरे तिकडे येतील आम्ही देशमुख कुटुंबीयांची जाऊन भेट घेणार आहोत. शिवसेनेला आता या विषयात लक्ष घालावे लागेल. देशमुख कुटुंबाची फसवणूक झाली आहे,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.