Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Avinash Jadhav : ‘…तर मराठी माणूस पुरून उरेल’, मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा कडक इशारा

मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. यावेळी अविनाश जाधव यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 08, 2025 | 05:05 PM
'...तर मराठी माणूस पुरून उरेल', मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा कडक इशारा

'...तर मराठी माणूस पुरून उरेल', मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा कडक इशारा

Follow Us
Close
Follow Us:

‘धरपकड झाली नसती आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता तर हा किमान ५० हजार लोक मोर्चात आले असते. मराठी माणसांसाठी अशीच एकजुट आपण दाखवूया. मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणूस फक्त १२ ते १५ टक्के आहे,असं इथला आमदार नरेंद्र मेहता नेहमी सांगतो. पण तेवढ्या टक्क्यावर आम्ही तुला पूरून उरू शकतो, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. मोर्चाचं नेतृत्व करणारे मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी मोर्चापूर्वीच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतरही मराठी माणसांनी मोठ्यासंख्येने रस्त्यावर उतरत मोठं आंदोलन केले.

MNS Morcha News: प्रताप सरनाईक मोर्चातून बाहेर; आंदोलकांचा कडाडून विरोध

अविनाश जाधव पुढे म्हणाले की, आपली एकजुट कायम राहू द्या. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आपली एकजुट कायम ठेवूया. जिथे कुठे दबाव टाकण्यात येईल तिथे मराठी माणूस एक होईल. मराठी माणसाच्या कोणी नादाला लागेल तर लक्षात ठेवा, असा कडक शब्दात इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान पोलिसांनी सुटका केल्यानंतर अविनाश जाधव यांनी थेट मीरारोड गाठले आणि मोर्चात सहभागी झाले. यावेळी त्यांनी सरकारवरही टीका केली. ‘महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसासोबत काही घडलं तर असेच मोर्चे निघतील याची सरकारने दखल घ्यावी.’, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आपली एकजुट कायम राहू द्या. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आपली एकजुट कायम ठेवूया. जिथे कुठे दबाव टाकण्यात येईल तिथे मराठी माणूस एक होईल. मराठी माणसाच्या नादाला कुणी लागेल त्याने लक्षात ठेवावे.’ अशा शब्दात अविनाश जाधव यांनी इशारा दिला.

तसंच, ‘मला रात्री पकडलं त्यावेळी मी जेवढा अवस्वस्थ झालो नव्हतो तेवढा मी इथे येताना अस्वस्थ होतो. जे काही मराठी माणसाने आज मीरारोड- भाईंदरमध्ये करून दाखवलं त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी ज्या पोलिस स्टेशनला होतो त्या पोलिस स्टेशनचा प्रत्येक हवालदार टीव्हीवर हाच मोर्चा पाहात होता. आंदोलन झाल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहत होतो. तो आनंद एका सर्वसामान्य मराठी माणसाच्या चेहऱ्यावरील होता. हा आनंद महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने घेतला असेल. प्रत्येक घराघरात हे आंदोलन गेलं आहे.

Mira Bhayandar MNS Morcha : दोन तासांच्या राड्यानंतर अखेर मिळाली परवानगी; मीरा भाईंदर रस्त्यावर मनसे-ठाकरे गटाचा मोर्चा

‘वसई-विरार परिसरातील आमच्या मनसौनिकांना अटक करण्यात आली. त्यानंतर लोकं रस्त्यावर उतरली. आमच्या लोकांना गाडीतून घेऊन जात होते. उचलू उचलू गाडीत भरत होते. आम्ही काय दहशतवादी आहोत का? मीरा-भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान आणि गुजरातमध्ये आहे. मीरा-भाईंदर हे महाराष्ट्रात असल्यास मराठी माणसाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे.’ तसंच, ‘नरेंद्र मेहता या माणसामुळे हा मोर्चा निघाला. ३० ते ४० सेकंदाचा व्हिडीओ त्याने व्हायरल केला. या सगळ्याची जबाबदारी त्या माणसाची आहे. इथला मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. मराठी माणसाला कमजोर समजू नका. या महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. आम्ही उपाशी मरणार नाही. आम्ही ठरवले तर तुम्ही उपाशी मराल.’, असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title: Mns avinash jadhav warn maharashtra government during mns mira bhayandar marathi morcha marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 04:04 PM

Topics:  

  • mira bhaynder
  • MNS
  • MNS Protest

संबंधित बातम्या

MNS leader joins Shiv Sena : मनसेचा विश्वासू शिलेदार आता शिंदेंचा साथीदार; शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
1

MNS leader joins Shiv Sena : मनसेचा विश्वासू शिलेदार आता शिंदेंचा साथीदार; शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष
2

Navi Mumbai : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Thackeray Brother Alliance Announcement: उद्धव ठाकरे- राज ठाकरे आज युतीची अधिकृत घोषणा करणार; मुंबईत घडामोडींना वेग
3

Thackeray Brother Alliance Announcement: उद्धव ठाकरे- राज ठाकरे आज युतीची अधिकृत घोषणा करणार; मुंबईत घडामोडींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.