
Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी
दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन, साताऱ्यात संताप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
#WATCH | Mumbai | A large crane collapsed on a house in Qureshi Nagar, Kurla, late last night, leaving more than 10 people injured pic.twitter.com/dEp7W8GlYX — ANI (@ANI) August 21, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एका प्रकल्पाचे काम सुरु आहे. या कामादरम्यान शुक्रवारी, मध्यरात्री एक जेसीबी मशीन दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केली जात होती. यासाठी क्रेनच्या मदतीने ही जेसिबी मशीन उचलून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचे काम रात्री 2.40 वाजण्याच्या सुमारास सुरु होते. यावेळी संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता. मात्र यावेळी काहीजण खाली थांबून या घटनेचा व्हिडीओ शूट करत होते. हे काम सुरु असतानाच अचानक क्रेन आणि जेसिबी खाली कोसळले आणि मोठा आवाज झाला.
क्रेनचा एक भाग दोन घरांवर आणि नंतर रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडला. या अपघातात 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच, परिसरातील एक कार आणि ऑटो-रिक्षावर देखील क्रेनचा काही भाग पडला. त्यामुळे या घटनेत वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. क्रेन हटवण्याचे काम सुरु असून संबंधित परिसरात सध्या प्रवेश बंद करण्यात आला आहे.
क्रेनचा काही भाग कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यान असलेल्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन आणि सिंगल रेल्वे ट्रॅकवर आदळला. खरं तर या मार्गावरून प्रामुख्याने मालगाड्यांची वाहतूक सुरु असते. त्यामुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांवर या घटनेचा कोणताही परिणाम झाला नाही.