'या' वेळेत अंधेरी ते गोरेगाव मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार, प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक
हार्बर आणि पश्चिम मार्गावरीस अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर नॉन इंटरलॉकिंगची कामे करण्यासाठी रविवारी (29 सप्टेंबर) रात्री विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणाम या काळात अंधेरी ते गोरेगाव मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहेत.
हार्बर मार्गावर रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत दहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी रात्री 12.30 वाजता सुरू होईल आणि सोमवारी सकाळी 10.30 वाजता संपेल. अंधेरी ते गोरेगाव दरम्यान हार्बर लाइन उपनगरीय सेवा या कालावधीत उपलब्ध होणार नाहीत. मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अंधेरी आणि गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर विशेष वाहतूक आणि पॉवर (मध्यरात्री पॉवर) ब्लॉक चालतील. या ब्लॉकचे कारण मोठे नॉन-इंटरलॉकिंग काम आहे, जे 10 तास चालेल.
रविवारी २९ सप्टेंबर रोजी रात्री अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री १२.३० ते सोमवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांपर्यंत दहा तासांचा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत अंधेरी ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहे. रविवारी रात्री १० वाजून ५४ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून गोरेगावकरिता शेवटची लोकल चालविण्यात येणार आहे. ब्लॉक संपल्यानंतर सोमवारी सकाळी १० वाजून २२ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून गोरेगाव लोकल सुटणार आहे. तर गोरेगाव स्थानकातून अप मार्गावर सीएसएमटीकडे जाण्यासाठी सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी लोकल चालविण्यात येणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
तर या कालावधीत काही लोकल सेवा रद्द, तर काही अंशतः रद्द असणार आहेत. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २९) रात्री १२ वाजल्यापसून ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत हा दहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकपूर्वी आणि नंतरच्या शेवटच्या आणि सुरुवातीच्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक
– डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची ट्रेन (ब्लॉकपूर्वी): सीएसएमटीहून २२.५४ वाजता सुटेल आणि गोरेगावला २३.४९ वाजता पोहोचेल.
– अप हार्बर मार्गावरील शेवटची ट्रेन (ब्लॉकपूर्वी): गोरेगावहून 00.07 वाजता निघेल आणि 01.02 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
– डाऊन हार्बर मार्गावरील पहिली ट्रेन (ब्लॉकनंतर): CSMT वरून 10.22 वाजता सुटेल आणि 11.16 वाजता गोरेगावला पोहोचेल.
– अप हार्बर मार्गावरील पहिली ट्रेन (ब्लॉकनंतर): गोरेगावहून 11.23 वाजता निघेल आणि 12.21 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.