Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे...; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
मुंबई: मुंबईमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज दिवसभरात मुंबईत काही ठिकाणी 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र या पावसातच आता मोठी घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील मोनोरेल अचानक वाटेतच बंद पडली आहे. गेल्या दीड ते दोन तासांपेक्षा जास्त काळ प्रवासी मोनोरेलमध्ये अडकून पडले आहेत. अग्निशमन दल, पोलिस प्रशासन यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे.
मोनो रेल्वे सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली. प्रवाश्यांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले आहे.
मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने मोनोरेल मध्येच बंद पडल्याचे म्हटले जात आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे मोनो रेल बंद पडल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आता प्रवासी दोन तासांपासून या बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये अडकून पडले होते. अग्निशमन दल व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले होते.
दरम्यान आता अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अग्निशमन दलाने रेस्क्यू करण्यास सुरूवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच जवळील रूग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थोड्याच वेळात सर्व प्रवाशांचे रेस्क्यू पूर्ण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोस्ट काय?
काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये.
काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2025
सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल. सर्वांनी संयम ठेवावा, ही माझी सर्वांना विनंती आहे. मी एमएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे. हा प्रकार का घडला, याचीही चौकशी करण्यात येईल.
घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
पावसामुळे हार्बर लाइन असल्यामुळे सगळी गर्दी ही मोनो रेलकडे वळला. मेट्रोपेक्षा मोनोरेलची क्षमता कमी आहे. पाऊस सुरू होता. सर्वांना लवकर घरी जायचे होते. हार्बर लाइन बंद झाल्याने या ठिकाणी गर्दी वाढली. गर्दी वाढल्याने मोनो एका बाजूला थोडीशी झुकली. या खाली जो इलेक्ट्रिक सप्लाय असतो, तो डिसकनेक्ट झाला. त्यामुळे मोनो बंद पडली. हे कसे घडले याची चौकशी नंतर होईल. मात्र आधी बचावकार्य महत्वाचे आहे. त्याबाबत मी सूचना दिलेल्या आहेत. जास्तीत जास्त यंत्रणा लावून बचावकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.