
मीरा भाईंदर महापालिकेत मराठी महापौर व्हावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात पोलिसांनी नोटीस बजावली आहे. हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप भाजप कडून करण्यात आला आहे. काहीही झाले तरी मराठी माणसाच्या हक्कासाठी पुकारलेले आंदोलन आजच होणार असा इशारा गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे.