Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईच्या पठ्ठ्याची हिमाचलमध्ये उत्तुंग भरारी; आव्हानात्मक ‘फ्रेंडशिप पीक’वर फडकवला तिरंगा!

नवी मुंबईच्या उत्तम डे यांनी हिमालयातील ५,२८९ मीटर उंचीचे 'फ्रेंडशिप पीक' यशस्वीरीत्या सर करून तिरंगा फडकवला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी सिद्ध केले की, शारीरिक उंचीपेक्षा ध्येय गाठण्याची जिद्द आणि मोठी स्वप्ने पाहण्याची मानसिकता सर्वात महत्त्वाची असते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 22, 2026 | 06:54 PM
नवी मुंबईच्या पठ्ठ्याची हिमाचलमध्ये उत्तुंग भरारी; आव्हानात्मक ‘फ्रेंडशिप पीक’वर फडकवला तिरंगा!
Follow Us
Follow Us:

नवी मुंबई, जून २०२६: नवी मुंबईतील गिर्यारोहक आणि साहसी क्रीडाप्रेमी उत्तम डे यांनी हिमाचल प्रदेशातील फ्रेंडशिप पीक यशस्वीरीत्या सर केले आहे. हिमालयातील पिर पंजाल पर्वतरांगेत वसलेले हे शिखर समुद्रसपाटीपासून ५,२८९ मीटर (१७,३५३ फूट) उंचीवर असून, भारतातील उच्च-उंचीच्या गिर्यारोहणासाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रतिष्ठित प्रवेशद्वारांपैकी एक मानले जाते.

ही मोहीम मनालीपासून सुरू झाली आणि सोलंग व्हॅली, अल्पाइन कुरणे, मोरेन प्रदेश तसेच हिमनद्यांनी पोसलेल्या निसर्गरम्य भूभागातून पुढे सरकली. लोहाली, लेडी लेग आणि समिट कॅम्प येथे टप्प्याटप्प्याने तळ उभारण्यात आले. अंतिम चढाईसाठी ९ जून रोजी रात्री ११ वाजता प्रयाण करण्यात आले. ही रात्रभराची चढाई आवश्यक होती, कारण कोलच्या पुढील भागात हिमभेगा (क्रेव्हासेस) आणि हिमस्खलनाचा धोका असलेले क्षेत्र आहे. पहाटे मिळालेल्या अनुकूल वेळेत शिखर गाठल्याने सूर्याच्या उष्णतेमुळे बर्फ मऊ होण्यापूर्वी सुरक्षितपणे खाली उतरणे शक्य झाले.

कोस्टल रोडवर साकारणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र! रिलायन्सकडून ५१ हेक्टरचा कायापालट; पर्यटन, मनोरंजन केंद्रे उभारली जाणार

आई-वडिलांचे आशीर्वाद, ईश्वरकृपा, शांत वारे, स्वच्छ हवामानाची अनुकूल संधी आणि पर्वतरूपी मातृशक्तीच्या कृपेने उत्तम यांनी सुमारे १० तासांची चढाई पूर्ण करून १० जून २०२६ रोजी सकाळी ६:०५ वाजता शिखर सर केले. शिखरावर पोहोचल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. त्यांनी हसतमुखाने भारतीय तिरंगा उंच फडकावला.

मालमत्ता कराचे जुने रेकॉर्ड होणार डिजिटल; मुंबई महापालिका नेमणार ५४ डेटा एंट्री ऑपरेटर

उत्तम डे म्हणाले, “जेव्हा तुम्ही पर्वतांच्या कुशीत जाता, तेव्हा पर्वत तुम्हाला नम्र राहण्याची शिकवण देतात. ते विनम्रता शिकवतात, स्वतःला किंवा पर्वताला कधीही कमी लेखू नका असे सांगतात, जमिनीवर पाय ठेवून राहण्याची आणि सतत पुढे चालत राहण्याची प्रेरणा देतात.”
ते पुढे म्हणाले, “माझी उंची पाच फूट असल्यामुळे अनेकदा माझ्यासारख्या उंचीच्या लोकांना कमी लेखले जाते. पण पर्वत मला बळ देतात. ते मला सांगतात, ‘उत्तम, आयुष्यात स्वतःला कमी समजू नकोस—फक्त पुढे जात राहा.’ मी जेव्हा पर्वत चढतो, तेव्हा जगाला एक संदेश द्यायचा असतो की उंचीने लहान असणे काहीच महत्त्वाचे नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची मानसिकता आणि कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची जिद्द.”

Web Title: Navi mumbai maountainnier uttam de completed friendship peak mountain top in himalaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 06:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.