मुंबई : गेल्या बुधवारी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या घरी पहाटे सहा वाजताच ईडीने धाड टाकली होती. त्यानंतर चौकशीसाठी मलिकांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि सरतेशेवटी आठ तासांच्या चौकशी अंती त्यांना अटक करण्यात आली. नवाब मलिक यांच्यावरील कारवाई सध्या सुरु असतानाच त्यांचा मुलगा फराझ मलिक यांना देखील ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहेत.
[read_also content=”तब्बल १८७ वर्षांनंतर काशी विश्वनाथ मंदिराला पुन्हा सुवर्ण झळाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली स्तुती – पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/latest-news/kashi-vishwanath-temple-is-gold-plated-after-187-years-prime-minister-narendra-modi-praised-the-beauty-nrsr-246663.html”]
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यांच्यावर बुधवारी अटकेची कारवाई केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मात्र, अटकेनंतर दोन दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्याची आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुन्हा त्यांची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आली आहे.