NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी
राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
एकूण मंजूर रकमेतील ३८ टक्के वाटा
एनसीएलटीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात मंजूर झालेल्या योजनांपैकी जवळपास एकतृतीयांश योजना मुंबई खंडपीठाने मंजूर केल्या, तर एकूण मंजूर रकमेतील सुमारे ३८ टक्के वाटा मुंबईचा आहे. मुंबईनंतर प्रधान आणि नवी दिल्ली खंडपीठाने २९ योजनांना मजुरी दिली. चंदीगड खंडपीठाने नऊ, तर अहमदाबाद खंडपीठाने आठ योजनांना मंजुरी दिली.
सहामाहीत १८५ योजनांना मंजुरी
१४ सदस्यांची पदे रिक्त; सुप्रीम कोर्टाकडून दखल
वाढत्या कामकाजादरम्यान सदस्यांची कमतरता आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही आव्हाने कायम आहेत. अध्यक्षांव्यतिरिक्त ६२ सदस्यांची मंजूर संख्या असताना सध्या ४८ सदस्य कार्यरत असून, १४ पदे रिक्त आहेत, चालू वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी चार सदस्य पदावरून निवृत्त होणार आहेत. सध्या १३ न्यायालयांचे कामकाज पूर्ण दिवस, तर १८ न्यायालयांचे अर्धा दिवस चालते. प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी जुन्या प्रकरणांना प्राधान्य, सुनावणीचे नियोजन आणि कामकाजावर नियमित देखरेख ठेवली जात आहे. एनसीएलटीमधील नियुक्त्या आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांची सर्वोच्च न्यायालयाने स्वत हुन दखल घेतली आहे, प्रादेशिक खंडपीठांमधील मूलभूत सुविधांचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात आले आहेत.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






