Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत

तलासरी तालुक्यातील वेवजी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवार ३१ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 31, 2025 | 11:41 PM
धक्कादायक! अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत

धक्कादायक! अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत

Follow Us
Follow Us:

तलासरी तालुक्यातील वेवजी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवार ३१ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली आहे. अशोक धोडी बेपत्ता झाल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी त्यांचा तपास लागला असून गुजरात मधील भिलाड नजीकच्या सरिगाम येथील एका बंद दगड खडणीत त्यांच्या वाहनासह मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचे भाऊ अविनाश धोडी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यामुळे त्यांच्यातील वयक्तिक वादातून (पूर्ववैमनस्यातून) अशोक धोडी यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

तलासरी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी २० जानेवारी रोजी मुंबईला कमनिमित्त गेले होते. तिथून परतत असताना त्यांनी घरी फोन करून जेवायला येतो असे सांगितले. त्यांनतर घोलवड वरून त्यांच्या घरी वेवजी येथे परतत असताना त्यांच्या वाहनासह त्यांचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी कुटुंबीयांनी घोलवड पोलीस ठाण्यात धाव घेत ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. अनेक दिवस उलटून देखील अशोक धोडी यांचा तपास लागत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी संशयितांच्या नावे गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर संशयित अविनाश धोडी (वेवजी – तलासरी) मनोज राजपूत (सरीगाम – गुजरात) आणि सुनील धोडी (जामशेत – डहाणू) या तीन जणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तीनही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत तपास सुरू केल्यानंतर यातील अविनाश धोडी आणि अन्य एक आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याचे समोर आले होते. यामुळे अशोक धोडी यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. अखेर अटक संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार तपासात तब्बल १२ दिवसांनंतर अशोक धोडी यांचा पत्ता लागला असून त्यांच्या मृहदेह गुजरात मधील सरिगाम येथे त्यांच्या वाहनामध्ये मागच्या बाजूला त्यांचा दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली असून अशोक धोडी यांच्या कुटुंबियांकडून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

 

Web Title: Palghar social worker ashok dhodi kidnapped and killed dead body found in stone quarry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 11:41 PM

Topics:  

  • Mumbai Police news
  • Palghar crime news
  • Palghar news

संबंधित बातम्या

School Holiday: मुसळधार पावसामुळे ‘या’ जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
1

School Holiday: मुसळधार पावसामुळे ‘या’ जिल्ह्यात उद्या शाळा-कॉलेजांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.