Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratan Tata Passed Away: रतन टाटा यांचे निधन, भारतीय उद्योगजगताचा चेहरा हरपला…

भारतीय उद्योग क्षेत्राची जगभर ओळख निर्माण करणारे आणि दातृत्वासाठी ओळख असणारे टाटा सन्सचे प्रमुख रतन टाटा यांचे निधन झाले आहे. प्रत्येक भारतीयांच्या मनात आदरांचे स्थान असणाऱ्या उद्योगपतीपैकी एक रतन टाटा होते.

  • By नारायण परब
Updated On: Oct 10, 2024 | 12:26 AM
रतन टाटा यांचे निधन

रतन टाटा यांचे निधन

Follow Us
Close
Follow Us:

जगातील मोठे उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष  रतन टाटा यांचे निधन झाले आहे. भारताच्या उद्योगजगताचा तारा आज निखळला. रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे त्यांना  मुंबईतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. डॉ.शारुख अस्पी गोलवाला यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांचे पथक रतन टाटा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे जाणे भारतीय उद्योगजगतालाच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी दुख:दायक आहे.

सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी रतन टाटा यांची अचानक बिघडल्याची बातमी समोर येत होती. मात्र त्यांनी स्वतः आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याला अफवा असल्याचे म्हटले होते.आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याचे खंडन करताना रतन टाटा स्वतः म्हणाले होते की, ‘माझ्या प्रकृतीबद्दल अलीकडे पसरलेल्या अफवांची मला माहिती मिळाली.मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की हे दावे निराधार आहेत. माझे वय आणि तब्येत यामुळे मी सध्या आवश्यक वैद्यकीय तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मला बरे वाटत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की जनता आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवणे टाळावे, अशी माहिती रतन टाटा यांनी सोशल मीडियावरुन दिली होती.

टाटा उद्योगसमुहाचे माजी प्रमुख रतन नवल टाटा हे भारतातीलच नव्हे तर जगभरात भारताच्या उद्योगजगताचे चेहरे होते.  त्यांच्या दातृत्वासाठी ते कायम ओळखले जात. त्यांना भारत सरकारने  पद्मविभूषण (2008) आणि पद्मभूषण (2000) दोन सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते.   ते प्रतिष्ठित कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, बिशप कॉटन स्कूल (शिमला), कॉर्नेल विद्यापीठ आणि हार्वर्डचे माजी विद्यार्थी आहेत.

रतन टाटा यांच्याविषयी…

  • टाटा यांनी मार्च 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले आणि 28 डिसेंबर 2012 रोजी निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा महसूल अनेक पटींनी वाढला. हा महसूल 1991 मध्ये फक्त 10,000 कोटी रुपयांच्या उलाढालीवरून 2011-12 मध्ये US$100.09 अब्ज इतका वाढला.
  • 2000 मध्ये टाटा टी कडून US$450 दशलक्ष मध्ये टेटली, 2007 मध्ये £6.2 बिलियन मध्ये टाटा स्टील कडून पोलाद निर्माता कोरस आणि 2008 मध्ये £2.3 बिलियन मध्ये टाटा मोटर्स यासह काही महत्त्वपूर्ण संपादनांद्वारे त्यांनी समूहाचे नेतृत्व केले. यूएस डॉलर्समध्ये ऐतिहासिक जग्वार लँडचा समावेश आहे.
  • निवृत्तीनंतर टाटा यांना त्यांचे उत्तराधिकारी सायरस मिस्त्री यांच्याशी बोर्डरूम युद्धाचा सामना करावा लागला. ज्यांना 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले.
  • मिस्त्री यांना हटवल्यानंतर ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून परत आले आणि जानेवारी 2017 मध्ये समूहाचे नेतृत्व एन. चंद्रशेखरन आणि टाटा सन्सच्या मानद अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारली.

Web Title: Ratan tata passes away indian industry loses its face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 11:56 PM

Topics:  

  • Ratan Tata
  • Ratan Tata Death

संबंधित बातम्या

“त्यांना परमेश्वराने अमरत्व द्यावं…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं रतन टाटा आणि बाबा आमटेंविषयी मत
1

“त्यांना परमेश्वराने अमरत्व द्यावं…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं रतन टाटा आणि बाबा आमटेंविषयी मत

Ratan Tata Will: रतन टाटांचे 3,800 कोटी रुपये; सर्वाधिक वाटा धर्मादाय संस्थेला, कोणाला काय मिळेल?
2

Ratan Tata Will: रतन टाटांचे 3,800 कोटी रुपये; सर्वाधिक वाटा धर्मादाय संस्थेला, कोणाला काय मिळेल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.