Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravindra Chavan: भाजप कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती, पक्षाने दिली महत्त्वाची जबाबदारी

भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांनी तात्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 11, 2025 | 11:03 PM
रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी अखेर माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. घोषणा प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी रविंद्र चव्हाण यांच्या् नावाची केली. राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजागी आता चव्हाण प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. 

मोठी बातमी! महाविकास आघाडी तुटली; मुंबई ते नागपूरपर्यंत शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा निर्णय

महाजनांची होती चर्चा 

महायुती सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांच्या ऐवजी प्रदेशाध्यक्षपदी नवी नियुक्ती केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तर रविंद्र चव्हाण यांच्या आधी नव्या कार्यकारी अध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीष महाजन यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र महाजन यांची वर्णी मंत्री पदावर लागल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदी चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. अखेर शनिवारी महाराष्ट्र भाजपचा शिर्डी येथे महाविजयी मेळावा सुरु असतानाच रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

रविंद्र चव्हाणांना मंत्रीपद नव्हते 

दरम्यान, राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवित महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हा रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद देण्यात आले नव्हते आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार याची चर्चा सुरू झाली होती.  काही दिवसांपूर्वीच चव्हाण यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे समोर आले होते. त्यांची पक्षाच्या नव्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी देताना संघटन पर्व प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासूनच चव्हाण यांच्याकडे आणखीन एक मोठी जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. 

राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींचा इतिहास उलगडणार, प्रदर्शनीय फलक शाळा, कॉलेजातही झळकणार

पालिका निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची पावलं 

रविंद्र चव्हाण हे कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. निवडणुकांचे योग्य मॅनेजमेंटही त्यांना अवगत असून त्यांनी नेहमीच आपला कामातून ठसा उमटवला आहे. ठाणे,पालघरसह कोकण मध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी अतिशय महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे. लवकरच मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकामध्ये भाजपाच्या यशाचा आलेख आणखीन चढता ठेवण्याची मोठी जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्याकडे असणार आहे आणि त्यामुळे ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. 

भाजपकडून घोषणा

Ravindra Chavan, appointed as Working State President of Maharashtra BJP pic.twitter.com/u0YZODMmH1

— ANI (@ANI) January 11, 2025

Web Title: Ravindra chavan appointed as working state president of maharashtra bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 10:28 PM

Topics:  

  • BJP Devendra Fadnavis
  • Latest Political News
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

पुणे भाजपची कार्यकारिणी जाहीर; सरचिटणीसपदी साळेगावकर तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी मोहोळ
1

पुणे भाजपची कार्यकारिणी जाहीर; सरचिटणीसपदी साळेगावकर तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी मोहोळ

Kalyan News: ‘या’ इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास लागणार मार्गी, रवींद्र चव्हाण यांची माहिती
2

Kalyan News: ‘या’ इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास लागणार मार्गी, रवींद्र चव्हाण यांची माहिती

चीनमध्ये खळबळ! उच्चपदस्थ राजदूत लिऊ जियानचाओ यांना अटक, परराष्ट्र मंत्रिपदाच्या होते शर्यतीत
3

चीनमध्ये खळबळ! उच्चपदस्थ राजदूत लिऊ जियानचाओ यांना अटक, परराष्ट्र मंत्रिपदाच्या होते शर्यतीत

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेरण्यासाठी काँग्रेसची नवी खेळी; ‘या’ पक्षाशी करणार हातमिळवणी?
4

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेरण्यासाठी काँग्रेसची नवी खेळी; ‘या’ पक्षाशी करणार हातमिळवणी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.