काय होती मागणी, मंगलप्रभात लोढा यांनी सोशल मीडियावर केले शेअर
मुंबईः देशाच्या इतिहासात राष्ट्र पुरुष थोर महापुरुषांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुष थोर व्यक्तींची जयंती साजरी करताना प्रदर्शनीय भागात त्यांचे फलक झळकवा, असे परिपत्रक राज्य सरकारने शुक्रवारी जारी केले आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या मागणीनुसार मंत्रालय, शासकीय कार्यालये महाविद्यालय शाळा यांनाही यापुढे राष्ट्र पुरुष थोर व्यक्तींचा इतिहास उलगडावा यासाठी प्रदर्शनीय भागात त्यांचे फलक झळकवा, असा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे.
देशाच्या इतिहासात राष्ट्रपुरुष थोर महापुरुषांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे राष्ट्र पुरुष थोर व्यक्तींची जयंती साजरी करताना प्रदर्शनीय भागात त्यांचे फलक झळकवा, असे परिपत्रक राज्य सरकारने शुक्रवारी जारी केले आहे. दरम्यान, मंत्रालय, शासकीय कार्यालये महाविद्यालय शाळा यांनाही यापुढे राष्ट्र पुरुष थोर व्यक्तींचा इतिहास उलगडावा यासाठी प्रदर्शनीय भागात त्यांचे फलक झळकवा, असा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे.
जयंतीदरम्यान फलकही लावावेत
महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. या कार्यक्रमांच्या वेळी सर्वसामान्य जनतेस महापुरुषांच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी शासनाने थोर महापुरुषांची जयंती असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलकही लावण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. शुक्रवारी याबाबत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये येथे त्यांच्या प्रतिमेसह जीवन चरित्राची माहिती देणारे फलकही लावण्यात येतील. तसेच ‘जयंती फलक या शीर्षकाखाली https://gad.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर सदर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या देशाला अनेक थोर व्यक्तींचा आणि राष्ट्रपुरुषांचा इतिहास लाभला आहे आणि पुढच्या पिढीला याची माहिती योग्यरित्या मिळायला हवी. इतकंच नाही तर पुढच्या पिढीला शाळा आणि महाविद्यालयातून याचे महत्त्वही कळायला हवे आणि ते फलकाद्वांरेही समोर दिसायला हवे. शासनाच्या संकेतस्थळावरही याची इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे आणि हा खरंच एक स्तुत्य प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
त्या पत्राची घेतली दखल
या मागणीसाठी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यासंदर्भात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना गेल्यावर्षी पत्र लिहिले होते. हे पत्र लिहिताना राज्याच्या सर्व शासकीय कार्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी लोढा यांनी या पत्रात केली होती अखेर ती मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे सगळीकडे नक्कीच आनंदाचे वातावरण आहे. तर आता ही मागणी मान्य झाल्यानंतर शाळा, कॉलेजात अंमलबजावणी बंधनकारक असल्याचेही आता समोर आले आहे.
मोठी बातमी! महाविकास आघाडी तुटली; मुंबई ते नागपूरपर्यंत शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा निर्णय
असे आहे परिपत्रक