'दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी आता वाट बघणार नाही तर...'; विनायक राऊत, अरविंद सावंत यांचा मध्य रेल्वेला इशारा
Dadar-Ratnagiri Passenger Train : कोरोनाकाळात बंद करण्यात आलेल्या दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी आज माजी खासदार विनायक राऊत आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेतली. गेल्या ५ वर्षांपासून सुरू असलेली पॅसेंजर ट्रेन तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र रेल्वेने जे उत्तर दिलं ते कोकणच्या लोकांच्या तोंडाला पाण पुसणार आहे. आता या ट्रेनसाठी तीन सहा महिने वाट पाहणार नाही, असा इशारा विनायक राऊत यांनी मध्य रेल्वेला दिला आहे.
रेल्वे बोर्डाच्या परवानगीची आवश्यकता नाही : विनायक राऊत
खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली श्रेष्ठ मंडळ मंतर रेल्वेचे जनरल मॅनेजर मीना यांना भेटलो. दादर ते रत्नागिरी ट्रेन तातडीने पुन्हा एकदा सुटावी यासाठी ही भेट घेण्यात आली. दादर ते रत्नागिरी ट्रेन दुपारी सुटत होती. मात्र कोरोनाचा कारण सांगून बंद केली. मध्य रेल्वेच्या माध्यमातून थातूरमातूर उत्तर देण्यात आलं आहे. कामगार सेनेचे संजय जोशी यांच्या माध्यमातून दादरपर्यंत कशी येऊ शकते हे सिद्ध करून दाखवलं. मात्र जे उत्तर दिले ते कोकणच्या लोकांच्या तोंडाला पाण पुसणार आहे. तीन सहा महिने वाट पाहणार नाही. रेल्वे बोर्डाच्या परवानगीची आवश्यकता नाही, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
कोकण रेल्वे ही मुंबईत शिवसेनेच्या पुढाकाराने सुरू झाली. दिवा सावंतवाडी ही गाडी दादर वरून का सोडली जात नाही? पूर्वी वेळेचे नियोजन करून आणली जात होती. १ मार्च पर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही तर रेल रोको करू, असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत उदासिनता मात्र केवडीया स्थानकात वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास परवानगी आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये हा नियम का लावला जात नाही. येत्या शिवजयंती पर्यंत इथे पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी दररोज नोटीस बजावण्यात येते, परंतु ३० वर्ष राहणारे लोक बेघर होतात याबाबत म्हाडा आणि राज्य सरकारच्या वतीने मोफत घरे देण्यासाठी मागणी केली जाते. परळ एल्फिन्स्टन पुलांचे काम लवकर पूर्ण करावं. पर्यायी रस्ता बांधण्यासाठी रेल्वेच्या वतीने नियोजन केले पाहिजे. तसंच डोंबिवलीतील लोकांना बेघर करणाऱ्या नलावडे नावाच्या व्यक्तीला यापूर्वी संरक्षण शिंदेनी दिले त्यामुळे यामागे कोण आहे ते स्पष्ट होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
ईडीच्या लोकांनी कोर्टाकडून शिकावं
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने सुनावली शिक्षा सुनावली तरी ते मंत्री म्हणून कायम राहणार हे काय चाललंय?आकंठ भ्रष्टाचारात बुडालेले लोक आहेत. ईडीच्या लोकांनी कोर्टाकडून शिकावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.