Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरारमध्ये उभारणार १०० कोटींचे मँग्रोव्ह पार्क; वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी

वसई-विरार परिसरातील पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी विरारमध्ये सुमारे १०० कोटी रुपये खर्चून मँग्रोव्ह पार्क उभारण्याची योजना राज्य सरकारकडून राबवली जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 10, 2026 | 01:05 PM
विरारमध्ये उभारणार १०० कोटींचे मँग्रोव्ह पार्क; वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी

विरारमध्ये उभारणार १०० कोटींचे मँग्रोव्ह पार्क; वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी

Follow Us
Close
Follow Us:
  • विरार पश्चिमेतील मारंबळपाडा खाडी परिसरात सुमारे सहा एकर जागेवर १०० कोटींचे मँग्रोव्ह पार्क उभारण्याचा प्रस्ताव.
  • कांदळवनांच्या विविध प्रजातींचे संवर्धन, पर्यावरण शिक्षण केंद्र आणि समुद्री जीवसृष्टी अभ्यासासाठी ‘ओपन डेक’ उभारण्याची योजना.
  • या प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनासोबत वसई-विरार परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा.
वसई-विरार शहराच्या येथे पर्यटन विकासाला चालना देणारे सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचे मॅग्रोव्ह (कांदळवन) पार्क विरार उभारण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाचे आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे विरार पश्चिमेकडील मारंबळपाडा खाडी परिसरातील सुमारे सहा एकर जागेवर प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. कांदळवनांच्या विविध प्रजातींचे संवर्धन व्हावे, पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी आणि वसई-विरार परिसर पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे यावा, या उद्देशाने नालासोपारा मतदारसंघात मॅग्रोव्ह पार्क उभारण्याची मागणी आमदार राजन नाईक यांनी केली होती.

राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी महत्त्वाची बातमी; तब्बल 1 कोटी 5 लाख महिलांची नावे वगळणार?

कांदळवनांच्या विविध प्रजातींचे केले जाणार संवर्धन

या पार्कमध्ये कांदळवनांच्या विविध प्रजातीचे संवर्धन, पर्यावरण शिक्षणासाठी माहिती केंद्र तसेच समुद्री जीवसृष्टीच्या अभ्यासासाठी ‘ओपन डेक’ उभारण्याचीही योजना आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच स्थानिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या दौ-यावेळी विरोधी पक्षनेते मनोज पाटील, जिल्हा महामंत्री मनोज बारोट, गटनेते अशोक शेळके, नगरसेवक जितेंद्र पाटील, जयप्रकाश वझे, संजोग यंदे, शहराध्यक्ष विशाल राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील काळात विरार पूर्व भागात बर्ड पार्क उभारण्याचा तसेच महापालिकेच्या आरक्षित जागांवर सुशोभित उद्याने आणि क्रीडांगणे विकसित करण्याचा मानस असल्याचे आमदार राजन नाईक यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमांमुळे वसई-विरार परिसरातील पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

पार्क उभारणीच्या प्रस्तावित परिसराची पाहणी

या मागणीचा पाठपुरावा केल्यानतर मंत्रालयात दनमंत्री
गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत या प्रकल्पाबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना वन विभागाला देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्याऱ्यांच्या पथकाने मारंबळपाडा खाडी परिसराची पाहणी केली.

Right To Education प्रवेशाबाबत राज्य सरकारला हायकोर्टाचा झटका; जाचक निर्बंध रद्द

यावेळी उत्तर कोकण विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक ज्ञानेश्वर राक्षे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान, वसईचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार दीपक गायकवाड – तसेच वनपाल अंगद दत्तनुरे उपस्थित होते. या – वाहणीदरम्यान विरारजवळील मारंबळपाडा येथील नवीन जेट्टी आणि जुन्या जेट्टीदरम्यान मॅग्रोव्ह पार्क – उभारण्याचा प्रस्तावित परिसर पाहण्यात आला.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Virar mangrove park 100 crore project forest officers site inspection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • vasai
  • virar

संबंधित बातम्या

Horror Story : शेवटची ‘ती’ विरार लोकल, स्थिरावलेले रक्तासारखे लाल डोळे अन् एकटक…; अचानक होतो अदृश्य
1

Horror Story : शेवटची ‘ती’ विरार लोकल, स्थिरावलेले रक्तासारखे लाल डोळे अन् एकटक…; अचानक होतो अदृश्य

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड
2

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.