वसईच्या मालजी पाडा येथून शिवसेना उबाठाच्या शाखाप्रमुखाला वसई गुन्हे प्रकटीकरण कक्ष-२ ने गावठी दारू बनवत असताना रंगेहात पकडलं आहे. या बेटा वरुन तब्बल ३० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
वसईमधून एक अशी चोरीची घटना समोर येत आहे जी एखाद्या चित्रपटालाही लाजवेल. एका उच्चशिक्षित तरुणीने आपल्याच बहिणीच्या सासरच्या घरी दीड कोटी रुपयांचे दागिने लंपास केले.
ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याने एका तरुणाने आपल्या सावत्र आईची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे. तसेच हा गुन्हा लपवण्यासाठी आपल्या वडील आणि चुलत्याच्या मदतीने आईचा फरशीवर घसरून मृत्यू झाल्याचा…
वसई-विरारमधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून ७ उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले. यासाठी एमएमआरडीएने निधी उपलब्ध करून दिला होता, परंतु भूसंपादन आणि निधीअभावी काम थांबले होते.
शाळकरी मुले शाळेतून सुट्टी झाल्यावर घरी जात असतांना चाकूचा धाक दाखवत ३ तृतीयपंथांनी मुलांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा डाव गावकऱ्यांनी उधळून लावला आहे. गावकऱ्यांनी या चौघांना बेदम मारहाण…
मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं जीवावर बेतलं आहे. डोहात दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. काल सोमवारी वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते. त्यावेळी पोहत असतांना दोन्ही मुलं डोहात बुडाले.
पाऊलवाट फाउंडेशन, वसईतर्फे शहापूर तालुक्यातील वाशाळा खुर्द शाळेतील ३२ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासाला भक्कम आधार मिळाला आहे.
वसईमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वाढदिवसाच्या पार्टीत क्षुल्लक कारणातून वाद झाला. या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
वसईच्या किल्ल्यातील हनुमान मंदिरात अघोरी कृत्य करणाऱ्या आणि एका तरुणीवर तसे प्रयोग करुन तिच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या स्वयंघोषीत पुजारी आणि त्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई-विरार क्षेत्रात दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता असलेली ३३ दरड प्रवण क्षेत्रांची यादी पालिकेने जाहीर केली आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघात होण्याच्या अनेक घटना वसई-विरार परिसरात घडल्या आहेत.
Vasai Crime News: ससूनवघरचे ग्राममहसूल अधिकारी सुशील मोराळे यांनी कारवाई करत तब्बल २८ आरएमसी प्लांट धारकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नेमकं काय प्रकरण काय?
ऐन पावसाळ्यात स्मशानभूमीची झालेल्या दुरावस्थेमुळे प्रेतांच्या अंत्यविधीसाठीदेखील कुटुंबियांना अवहेलना सोसावी लागत आहे. नागरिकांचा इतका त्रास सोसावा लागत असून देखील पालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसून आहे.
दिवसेंदिवस वसई विरार परिसरात अनधिकृतपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांमुळे गुन्हेगारी वाढत जात आहे. नुकतच वसई शहरात अंमली पदार्थांचा मोठा साठा मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेविषयी आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
वसई विरारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. वसई विरारमध्ये ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केल्याचे समजते आहे. ४२ बेकायदेशीर इमारती प्रकरणात ई ही छापेमारी केल्याचे समजते आहे.
अरिहंत अकॅडमीने कार्मेल क्लासेसचे १००% संपादन करून वसईमधील आपली उपस्थिती बळकट केली आहे. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षक, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण आणि विविध अभ्यासक्रमांची सुविधा मिळणार आहे.