Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Crime News : वसई पोलिसांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक; बांगलादेशी चोरांकडून लाखोंच्या दागिन्यांसह विदेशी डॉलर्स जप्त

Vasai Crime News : वसई पश्चिमेतील गिरीज येथे एका वृद्धेच्या घरात भरदिवसा घरफोडी करून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा वसई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. माहीम कॉजवे परिसरातून दोन बांगलादेशी घुसखोर चोरट्यांसह चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या एका साथीदाराला अटक करण्यात आली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 10, 2026 | 11:40 AM
बांगलादेशी चोरांकडून लाखोंच्या दागिन्यांसह विदेशी डॉलर्स जप्त ( सौजन्य - सोशल मीडिया )

बांगलादेशी चोरांकडून लाखोंच्या दागिन्यांसह विदेशी डॉलर्स जप्त ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • वसईत भरदिवसा घरफोडी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद!
  • २ बांगलादेशी घुसखोरांसह दागिने खरेदीदाराला बेड्या
  • ६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त
Vasai Crime News : दिवाळीच्या तोंडावर भरदिवसा घरफोडी करून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात वसई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मोठे यश आले आहे. मुंबईतील माहिम कॉजवे झोपडपट्टीत सापळा रचून पोलिसांनी दोन सराईत चोरांना बेड्या ठोकल्या असून, धक्कादायक बाब देहणजे है दोधी असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या एका साथीदारासह तब्बल ६ लाख ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ( Vasai Crime News ) 

Vasai Virar Diwali Fire : दिवाळीत वसई-विरारमध्ये अग्नितांडव! 2 दिवसांत 25 ते 30 आगीच्या घटना; पालिकेच्या ढिसाळ कारभारावर संताप

पोलिस उपायुक्त (परिमंडळ-२) अशोक विरकर, सहायक पोलिस आयुक्त देवेंद्र पोळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सौरभी पवार व पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यांपावरीक्षक दिशाखाकार पोलिस हवालदार मुकेश तटकरे, प्रशांत पाटील, सूर्यकांत मुंढे, आप्पासाहेब गर्जे, प्रशांत आहेर, सौरभ दराडे, अक्षय नांदगावकर आणि दीपक भांगडे या पथकाने ही कारवाई केली.

फुटपाथवरून आवळल्या मुसक्या

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून डीबी पथकाने घटनास्थळाची पाहणी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. संशयित आरोपी वांद्रे-माहीम कॉजवे परिसरातील फुटपाथवर राहत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचून मोहम्मद निजाम मोहम्मद तासीर शेख (वय ४४) आणि जहांगीर शुकरअली शेख (वय ४०) या दोघांना ताब्यात घेतले.

गुन्हेगार बांगलादेशातील घुसखोर

पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी घरफोडीची कबुली दिली. हे दोघेही पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्याचे बनावट पत्ते सांगत असले तरी, ते मूळचे बांगलादेशातील घुसखोर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपी मोहम्मद निजाम याच्यावर यापूर्वी तब्बल ७ गंभीर गुन्हे, तर जहांगीरवर १ गुन्हा दाखल आहे. चोरीचा माल त्यांनी माहीम येथील दत्तात्रय काशिनाथ कोळी (वय ५२, व्यवसाय इलेक्ट्रिशियन) याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी दत्तात्रयलाही अटक केली असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि विदेशी अमेरिकन डॉलर्स असा ६ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गिरीजमध्ये केली भरदिवसा घरफोडी

वसई पश्चिमेकडील गिरीज, सादोडावाडी येथील ‘मॅथ्यू स्मृती’ बंगल्यात राहणाऱ्या जोस्पीन मॅथ्यू मार्टिन (वय ६७) या वृद्ध महिला घराबाहेर गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे ३ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी वसई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Ashram Shala Audit Palghar : अनुदान लाटणाऱ्या आश्रमशाळा सरकारच्या रडारवर! होणार झाडाझडती; त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट सुरु

💡

Frequently Asked Questions

  • Que: वसई पोलिसांनी घरफोडी प्रकरणात कोणाला बेड्या ठोकल्या आहेत?

    Ans: पोलिसांनी वांद्रे-माहीम कॉजवे परिसरातील फुटपाथवरून मोहम्मद निजाम मोहम्मद तासीर शेख आणि जहांगीर शुकरअली शेख या दोन बांगलादेशी घुसखोर चोरट्यांसह चोरीचा माल खरेदी करणारा दत्तात्रय काशिनाथ कोळी याला अटक केली आहे.

  • Que: पोलिसांनी आरोपींकडून किती रुपयांचा आणि कोणता मुद्देमाल जप्त केला आहे?

    Ans: आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि परदेशी अमेरिकन डॉलर्स असा एकूण ६ लाख ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • Que: ही घरफोडीची घटना कुठे आणि कशी घडली होती?

    Ans: वसई पश्चिमेकडील गिरीज, सादोडावाडी येथील एका बंगल्यात राहणाऱ्या ६७ वर्षीय वृद्ध महिला घराबाहेर गेल्या असताना चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि ३ लाख ४५ हजारांचा ऐवज लांबवला होता.

Web Title: Vasai crime illegal bangladeshi housebreaker gang arrested marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • crime
  • vasai

संबंधित बातम्या

Kalyan Crime: ‘तू मला आवडत नाहीस’ म्हणत पतीने चार मुलांसह पत्नीला घराबाहेर काढले; कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर
1

Kalyan Crime: ‘तू मला आवडत नाहीस’ म्हणत पतीने चार मुलांसह पत्नीला घराबाहेर काढले; कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर

राजकारणातील परिचित चेहरा हरपला; बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासोबत काम, निष्ठावंत शिवसैनिक Shirish Chavan काळाच्या पडद्याआड
2

राजकारणातील परिचित चेहरा हरपला; बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासोबत काम, निष्ठावंत शिवसैनिक Shirish Chavan काळाच्या पडद्याआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.