मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच कोकणातील भाजपचे प्रमुख नेते असलेल्या राजन तेली यांनी मात्र भाजपला रामराम ठोकला. ते आज (18 ऑक्टोबर) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज सायंकाळी पाच वाजता ते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधणार आहेत. तत्पुर्वीच त्यांनी भाजपचे सावंतवाडी मतदारसंघ प्रमुख राजन तेलींनी भाजप सदस्यत्वाचा राजिनामा दिला. पण राजन तेलींसाऱख्या प्रमुख नेत्याने भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय का झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजन तेली यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सावंतवाडीतील आपल्या कार्यालयावरील भाजपचे बॅनर्स आणि नेत्यांचे फोटोही हटवले. त्यांतर त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटोही लावण्यातआले. त्यामुळे राजन तेली ठाकरे गटात जाणार यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. याबाबत राजन तेली यांना भाजप सोडण्याचे कारण विचारले असता, त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला.
हेही वाचा: अज्ञात तिघांनी मोबाईलवरून केली फसवणूक; आजरा पोलिसांत गुन्हा दाखल
एकाच ‘एकाच कुटुंबाला एक लोकसभा, दोनदा विधानसभा आणि आता पुन्हा त्यांनाच तिसरी विधानसभा देणे मला योग्य वाटत नाही. घराणेशाही मला मान्य नाही. राणें कुटुंबियांकडून सुरू असलेल्या खच्चीकरणामुळे मी भाजप सोडत आहे. मी कायम पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला. पण राणे कुटुंबियांकडून मात्र माझ्यावर कायम अन्यायच झाला. त्यामुळेच मी हा निर्णय घेत आहे, असे राजन तेली यांनी म्हटले आहे.