File Photo : Crime
उत्तूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आजरा तालुक्यातील उत्तूर येथील ऋषिकेश दिनकर घेवडे (वय ३२ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. जूनी पोस्ट गल्ली, बाजरापेठ उत्तूर, सध्या रा. खडकपूर, प. मिदनापूर, प. बंगाल) यांची उत्तूर येथे ऑनलाईन माध्यमातून दहा लाखाची फसवणूक केली असून, याबाबत आजरा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. ऋषिकेश यास मोबाईल नंबरवरून अज्ञात तीन इसमांनी बोलण्यात गर्क करून फसवण्यात आले आहे
याबाबतची माहिती अशी की, ९ ऑक्टोबर रोजी अज्ञात तिघांनी ऋषिकेश यास मोबाईलवर उत्तूर येथे फोन केला. आम्ही लोकसेवक आहोत अशी बतावणी करुन, “मी फिडेक्स् इंटरनॅशनल कुरीयर सींसमधून बोलत आहे. तुम्ही पाठवलेले पार्सल स्टक झालेले आहे. ते काही कारणास्तव पुढे जावू शकत नाही.” असे सांगून व फिर्यादी यांचे पार्सलचे खोटी डिटेल्स दिली. त्यानंतर दुस-या अनोळखी इसमाने पुन्हा फिर्यादी यांचे फोन नंबरवर फोन करुन मी नॅशनल क्राईम ब्रांच मुंबई (एनसीबी) आयओ बोलत आहे. तसेच डीसीपी मिलिंद भारंबे बोलत आहे. लोकसेवक असल्याची बतावणी गुन्ह्यात अडकवण्याची भिती ऋषिकेश यास दाखवण्यात आली.
वारंवार बोलण्यात गर्क करून मो स्काय ॲप डाऊनलोड करावयास लावले. त्यावर ऋषिकेश यांच्या बँक खात्यांचे तपशील घेतले. आयसीसीआय बँकेच्या डेबिट कार्डचे तपशील प्राप्त करुन ऋषिकेशच्या आयसीआय खात्यावर १० लाख ९१ हजार इन्स्टा लोन घेण्यास सांगितले. ते लोन सुनिल सुदाम लोंढे सीटी लोन, बँक शाखा ठाणे, यांच्या खात्यावर १० लाख ९१ हजार रुपयांची रक्कम पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर ऋषिकेशची फसवणूक केली. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गडहिंग्लज करत आहेत.