Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parth Pawar यांच्या अडचणी वाढणार? व्यवहार रद्द झाला तरी….; ‘त्या’ जमीन प्रकरणात समोर आली नवीन माहिती

अमेडिया कंपनीच्या प्रतिनिधींना हे खरेदी खत रद्द करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला आहे. मात्र, हे खरेदीखत करताना मुद्रांक शुल्कातून माफीचा दावा करुन ते नोंदविण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 08, 2025 | 07:30 PM
Parth Pawar यांच्या अडचणी वाढणार? व्यवहार रद्द झाला तरी….; ‘त्या’ जमीन प्रकरणात समोर आली नवीन माहिती
Follow Us
Close
Follow Us:

दोन्ही पक्षकारांना ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागणार
१८०० कोटींची ४० एकर जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप
पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

पुणे: मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचे जमीन खरेदीचे दोन कारनामे उघड झाल्यानंतर अजित पवार यांच्यावर चौफेर टीका झाली. यानंतर बॅकफुटवर गेलेल्या अजित पवार यांनी मुंढवा येथील जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले. मात्र, कायदेशीरदृष्ट्या खरेदीखत रद्द करण्यासाठी दोन्ही पक्षकारांना ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी सोमवारनंतर कार्यवाही करावी लागेल, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंढवा येथील १८०० कोटी रुपयांची ४० एकर जमीन केवळ ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याप्रकरणी पार्थ पवार यांच्या कंपनीविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. ६) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खरेदीखतावेळी या जागेवर आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हा उद्योग केंद्राकडून मुद्रांक शुल्कात माफी घेण्यात आली होती. मात्र, दुय्यम निबंधकाच्या चुकीमुळे यातील सात टक्क्यांपैकी उर्वरित दोन टक्के मुद्रांक शुल्कदेखील आकारण्यात आले नाही.

Parth Pawar Pune Land Scam: पार्थ पवारांना धक्का: निबंधक कार्यालयाची जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी २१ कोटींची अट

अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ७) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे सांगितले. प्रत्यक्षात कायदेशीरदृष्ट्या खरेदीखताचा व्यवहार रद्द करण्यासाठी दोन्ही पक्षकारांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन रद्द करारनामा अर्थात कॅन्सलेशन डीड करावे लागणार आहे. त्यानुसार अमेडिया कंपनीच्या प्रतिनिधींना हे खरेदी खत रद्द करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला आहे. मात्र, हे खरेदीखत करताना मुद्रांक शुल्कातून माफीचा दावा करुन ते नोंदविण्यात आले होते.

मात्र, आता यातील डेटा सेंटर उभारण्याचे प्रयोजन रद्द झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या नियमानुसार या दस्तास देय असलेले महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाप्रमाणे ५ टक्के मुद्रांक शुल्क तसेच १ टक्का स्थानिक संस्था कर आणि १ टक्का मेट्रो सेस याप्रमाणे एकूण ७ टक्के दराने मुद्रांक शुल्क व त्यावरील दंड भरणे आवश्यक आहे. ही रक्कम २१ कोटीहून अधिक होत आहे. ही रक्कम मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करुन हा दस्त योग्य मुद्रांकीत करुन घेणे आवश्यक आहे, असल्याचे दुय्यम निबंधकांनी कळविले आहे.

तसेच या दस्ताद्वारे आधीचे खरेदीखत दस्त क्र. ९०१८-२०२५ रद्द करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे या दस्तास अभिहस्तांरणाप्रमाणे मिळकतीचे बाजारमूल्य व मोबदला या पैकी जास्त रकमेवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाप्रमाणे ५ टक्के मुद्रांक शुल्क तसेच १ टक्का स्थानिक संस्था कर आणि १ टक्का मेट्रो सेस याप्रमाणे एकूण ७ टक्के दराने मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. या दोन्ही रकमांचा भरणा अर्थात ४२ कोटी तसेच दंड भरून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा, असे अमेडिया कंपनीला कळविण्यात आले आहे.

 

Web Title: Mundhva parth pawar allegations land scam transaction cancel but charged 42 crore stamd duty pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 07:29 PM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

शरद पवारांना मोठा धक्का; बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
1

शरद पवारांना मोठा धक्का; बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Ahilyanagar News: निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या माजी आमदाराचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
2

Ahilyanagar News: निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या माजी आमदाराचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Sanjay Shirsat News:’नको त्या वेळी बोलणाऱ्यांनी आता बोलायला पाहिजे’: संजय शिरसाटांचा टोला कुणाला?
3

Sanjay Shirsat News:’नको त्या वेळी बोलणाऱ्यांनी आता बोलायला पाहिजे’: संजय शिरसाटांचा टोला कुणाला?

Parth Pawar Pune Land Scam: पार्थ पवारांना धक्का: निबंधक कार्यालयाची जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी २१ कोटींची अट
4

Parth Pawar Pune Land Scam: पार्थ पवारांना धक्का: निबंधक कार्यालयाची जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी २१ कोटींची अट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.