Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death : VSR च्या मालकांची विमानामध्ये डुलकी; जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

जय पवार यांनी धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये VSR कंपनीचे मालक हे विमान सुरु असताना को पायलट सीटवर बसून झोपा काढत असल्याची धक्कादायक बाब त्यांनी समोर आणली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 02, 2026 | 11:01 AM
Jay Pawar social media post on VSR Company owner Rohit Singh sleeps in the pilot seat

Jay Pawar social media post on VSR Company owner Rohit Singh sleeps in the pilot seat

Follow Us
Follow Us:
  • जय पवार यांची VSR कंपनीबाबत धक्कादायक पोस्ट
  • VSR कंपनीचे मालकांच्या विमानामध्ये बसून झोपा
  • जय पवारांनी रोष व्यक्त करत केली विनंती
Ajit Pawar Death : मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे (Ajit Pawar Plane Crash) हेलिकॉप्टर आणि विमानाची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अजित पवारांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला असून यानंतर जय पवार यांनी धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये VSR कंपनीचे मालक हे विमान सुरु असताना को पायलट सीटवर बसून झोपा काढत असल्याची धक्कादायक बाब त्यांनी समोर आणली आहे.

अजित पवार यांचा अपघात हा VSR कंपनीच्या विमानामध्ये झाला. या विमानावर DGCA ने अहवाल सादर झाल्यानंतर कारवाई देखील केली आहे. यामुळे कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, जय पवार यांनी VSR कंपनीचे मालक रोहित सिंह हे पायलटच्या जागेवर बसून झोपा काढत असल्याची बाब समोर आणली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील जय पवार यांनी केली आहे. याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर केली आहे.

हे देखील वाचा : अभिनेता पुष्कर श्रोत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक सुधाकर श्रोत्री यांचं निधन

जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विमान हवेमध्ये असताना पायलटच्या जागेवर बसून कंपनीचे मालक झोपले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंह हा मुख्य पायलटच्या सीटवर बसलेला दिसत आहे. तसेच विमान सुरु असताना तो झोपलेला दिसत आहे. या गंभीर निष्काळजीपणावर जय पवार यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

जय पवार यांनी लिहिले आहे की, माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे.

हे देखील वाचा : जावळीत सभापतिपदाच्या खुर्चीसाठी ‘ओढाताण’ सुरूच; मतदारांनी नेत्यांच्या डोळ्यात घातले ‘अंजन’

मी DGCA ला ठामपणे मागणी करतो — या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, अशी मागणी जय पवार यांनी केली आहे.

 

Web Title: Jay pawar social media post on vsr company owner rohit singh sleeps in the pilot seat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • political news

संबंधित बातम्या

केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग…’
1

केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग…’

CM Devendra Fadnavis : ‘अजित स्मृती अवित स्मृती’ या छायाचित्र प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट
2

CM Devendra Fadnavis : ‘अजित स्मृती अवित स्मृती’ या छायाचित्र प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट

अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत; ‘या’ तारखेला होणार लोकार्पण
3

अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत; ‘या’ तारखेला होणार लोकार्पण

तामिळनाडू राजकारणात मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीकेला द्रमुकची साथ
4

तामिळनाडू राजकारणात मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीकेला द्रमुकची साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.