नगराध्यक्ष ज्ञानदेव ज्ञानदेव पवार यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात करणार प्रवेश
माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ज्ञानदेव पवार यांच्या राजीनाम्यामुळे संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली आहे. ज्ञानदेव पवार यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी रायगड यांच्या कडे सुपूर्द केला आहे. नगराध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर ज्ञानदेव पवार लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी देखील हा पक्षरप्रवेश लवकरच होणार आहे. ज्ञानदेव पवार यांच्या पक्षप्रवेशाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेदेखील वाचा- सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या प्रयत्नांना यश, डिझेल तस्करीची केंद्र सरकारकडून दखल
ज्ञानदेव पवार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय घडामोडींना उधाण आलं आहे. या राजकीय घडामोडींमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार आहे असे मानले जाते. ज्ञानदेव पवार हे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष होते. त्यामुळे पुढील नगराध्यक्ष कोण होईल? याकडे माणगांवकरांचे लक्ष लागले आहे. मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा यासाठी उपोषण करून ज्ञानदेव पवार यांनी आंदोलन केलं होतं.
रखडलेला मुंबई गोवा महामार्ग तातडीने होण्यासाठी ज्ञानदेव पवार यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांच्यावर सडकून टीका करुन सत्ताधारी महायुतीला घरचा आहेर दिला होता. त्यानंतर ज्ञानदेव पवार यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर बरीच राजकीय उलथापालथ होणार आहे.
हेदेखील वाचा- “… त्यामुळे जनतेला बदल करून महायुतीचे सरकार बाजूला करायचे आहे”; शरद पवारांचे महत्व विधान
ज्ञानदेव पवार हे कुणबी समाजाचे अध्यक्ष असून श्रीवर्धन मतदारसंघात ६०% कुणबी समाज आहे. त्यांना महाआघाडी तर्फे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास राजकारणात फार मोठी रंगत येणार आहे. माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सन २०२१ मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत ज्ञानदेव पवार आपल्या वार्ड क्र.१६ मधून निवडून आले होते. शिवसेना पक्षाचे ज्ञानदेव पवार यांची अडीच वर्षाकरिता दि.१० फेब्रुवारी २०२२ रोजी माणगाव नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आपल्या कार्यकाळात ज्ञानदेव पवार यांनी रखडलेला मुंबई गोवा महामार्ग तातडीने होण्यासाठी आंदोलन केलं होतं.
ज्ञानदेव पवार यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे दिलेल्या राजीनाम्यात म्हटलं आहे की, मी आज दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष या पदाचा माझ्या राजीखुशीने राजीनामा देत असून तो मंजूर करावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. ज्ञानदेव पवार यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी असे म्हटले आहे कि, महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र क्र.४० दि.१६/०८/२०२४ अन्वये नगराध्यक्ष पदाचा कालावधी पाच वर्षे इतका करण्यात आलेला आहे.