Maharashtra Assembly Elections 2024: भाजपच्या 'चाणक्यां'नी विधानसभेसाठी पदाधिकाऱ्यांना दिला 'हा' गेम प्लॅन; 'मविआ'चे टेन्शन वाढले
नागपूर: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. लवकरच निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते. राज्यात आपली सत्ता यावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आघाडी आणि महायुतीतील सहभागी पक्ष देखील स्वतंत्रपणे किती जागा जिंकू शकतो किंवा कोणाला सत्ता मिळू शकते याचा अंतर्गत सर्व्हे करताना पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळेस त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी काही सूचना देखील केल्या आहेत. अमित शहा आज नागपूरमध्ये बोलत होते.
नागपूरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी अमित शहा यांनी सर्वांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्ता, पदाधिकारी यांनी काय केले पाहिजे, काय काळजी घेतले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. बंडखोरी आणि मतभेदातून होणारी फूट खपवून घेतली जाणार नसल्यचे शहा यांनी स्पष्ट केले आहे. आजच्या बैठकीत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना विजयाचा कानमंत्र दिला आहे.
🕞 3.20pm | 24-9-2024📍Kavivarya Suresh Bhat Auditorium, Nagpur | दु. ३.२० वा. | २४-९-२०२४📍कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर.
🪷 BJP Karykarta Samvad Baithak, Vidarbha Region chaired by Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah
🪷 आमचे नेते, मा. केंद्रीय गृह आणि सहकार… pic.twitter.com/5BSJUmy3x5— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 24, 2024
आगामी निवडणुकीमध्ये बूथ प्रमुखांची जबाबदारी वाढणार आहे . यंदाच्या प्रत्येकाला आपापल्या बूथवर १० टक्के मते वाढवायची आहेत. दसरा ते धनोत्रयोदशी या कालावधीत बूथमध्ये प्रचार करावा, बाईक रॅली काढाव्यात, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे असा सल्ला अमित शहा यांनी दिला आहे. राज्यातील ज्या नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या शासकीय योजनांचा लाभ होत आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्याची सूचना त्यांनी केली आहे. निवडणुकीपर्यंत या लाभार्थ्यांना किमान तीन वेळा भेटायचे आहे, अशा अनेक सूचना अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आगामी काळात होणारी विधानसभा महायुतीसाठी थोडी अवघड मानली जात आहे. राज्यात प्रत्येक पक्षाकडून सर्व्हे केले जात आहेत. दोन्ही बाजूंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरलेला नाहीये. जागावाटपावरून महायुती आणि महाविक आघाडीत धुसफूस असल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान राज्यात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न केले जात आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. दरम्यान आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ११ उमेदवारांची घोषणा केली आहे.