Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले सुरेंद्र पठारे हे पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 03, 2026 | 12:16 PM
गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले सुरेंद्र पठारे हे पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता तब्बल २७१ कोटी ८५ लाख २१ हजार ८७७ रुपये इतकी आहे.

प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार, पठारे कुटुंबाच्या मालमत्तेत स्थावर मालमत्तेचा मोठा वाटा असून, त्याचे मूल्य २१७ कोटी ९३ लाखांहून अधिक आहे. यामध्ये जमिनी, व्यावसायिक इमारती आणि निवासी मालमत्ता यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वित्तीय संस्था व इतर देणी मिळून ४६ कोटी ५९ लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याचेही स्पष्ट झाले आहे. याशिवाय बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि इनोव्हा क्रिस्टा यांसारख्या आलिशान वाहनांचाही त्यांच्या मालमत्तेत समावेश आहे.

उच्चशिक्षित असलेले सुरेंद्र पठारे यांनी COEP मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून ते गोल्ड मेडलिस्ट राहिले आहेत. शिक्षणानंतर त्यांनी विविध व्यवसायांमध्ये यशस्वी वाटचाल करत स्वतःची ओळख निर्माण केली. आता ते पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे, त्यांची पत्नी ऐश्वर्या पठारे या देखील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पक्षच्या उमेदवार आहेत.

सुरेंद्र पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बापू पठारे यांच्या विजयात सुरेंद्र पठारे यांच्या नियोजनबद्ध प्रचाराची मोठी भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुण्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील टीम अधिक भक्कम झाल्याचेही बोलले जात होते.

दरम्यान, पुण्यातील इतर उमेदवारांच्या मालमत्तेची तुलना केली असता, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांची कौटुंबिक मालमत्ता ७७ कोटी ६५ लाख रुपये आहे. तर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांची कौटुंबिक मालमत्ता ११ कोटी २२ लाख रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरल्याने सुरेंद्र पठारे हे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Web Title: Bjp candidate surendra pathare is the richest in pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • BJP
  • Election News
  • pune news

संबंधित बातम्या

‘जरांगे पाटलांचं आंदोलन फक्त स्वार्थासाठी, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी..,’ मनोज जरांगे पाटलांवर भाजप आमदाराचा घणाघात
1

‘जरांगे पाटलांचं आंदोलन फक्त स्वार्थासाठी, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी..,’ मनोज जरांगे पाटलांवर भाजप आमदाराचा घणाघात

NDA की इंडिया? आज लोकसभा निवडणूक झाली तर कोणाची सत्ता येणार? सर्व्हेत आकडे समोर, महाराष्ट्रात कोणाला किती जागा?
2

NDA की इंडिया? आज लोकसभा निवडणूक झाली तर कोणाची सत्ता येणार? सर्व्हेत आकडे समोर, महाराष्ट्रात कोणाला किती जागा?

भाजपला मोठा धक्का? भाजप मंत्र्याच्या भावाचा होणार शिंदे गटात पक्षप्रवेश
3

भाजपला मोठा धक्का? भाजप मंत्र्याच्या भावाचा होणार शिंदे गटात पक्षप्रवेश

Big Breaking: पुण्यात Cipla वर सर्जिकल स्ट्राइक; ‘या’ कारणांमुळे Tukaram Mundhe यांची कारवाई
4

Big Breaking: पुण्यात Cipla वर सर्जिकल स्ट्राइक; ‘या’ कारणांमुळे Tukaram Mundhe यांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.