पुरुष नसबंदीचं प्रमाण नक्की किती? महाराष्ट्रातील या जिल्ह्यात इतक्या पुरुषांनी केली नसबंदी
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे आरोग्य यंत्रणेला व पोलिस प्रशासनाला धक्का देणारी घटना समोर आली आहे. गावात बोगस डॉक्टर म्हणून ओळख असलेल्या आशुतोष मंडल यांच्या पत्नी सुनीता मंडल यांना शुक्रवारी, (दि.25) बेकायदेशीररित्या औषधोपचार करताना रंगेहात पकडण्यात आल्याची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी दिली. विशेष म्हणजे या दाम्पत्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची चर्चा आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
जिल्हा आरोग्य यंत्रणेअंतर्गत जिल्हाभरातील बोगस डॉक्टरांची पडताळणी सुरु करण्यात आली. याअंतर्गत एटापल्ली तालुका आरोग्य विभागाद्वारे 22 संशयित डॉक्टरांची यादी तयार करण्यात आली. या प्रकरणी जारावंडी येथील आशुतोष मंडल या तथाकथित डॉक्टरला पंचायत समिती कार्यालयात गुरुवारी, चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. सखोल चौकशीदरम्यान त्याच्याकडे वैध वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्याकडून भविष्यात वैद्यकीयव्यवसाय न करण्याचा प्रतिज्ञापत्र लिहून घेतले गेले. परंतु, या निर्णयाचा काहीच परिणाम न झाल्याचे पुढील दिवशी घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले.
सदर बोगस डॉक्टराची पत्नी सुनीता मंडल हिने प्रतिज्ञापत्राच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा औषधोपचार सुरू केले आणि या अवैध प्रकारांची माहिती मिळताच आरोग्य विभागाने धाड टाकून तिला रंगेहात पकडले. ही घटना जारावंडी गावातच घडली असून, तिला तत्काळ जारावंडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, थोड्याच वेळात तिला सोडून देण्यात आले. या प्रकरणीत तिच्यावर कोणतीही फौजदारी कारवाई झालेली नाही, ही बाब अधिक चिंताजनक ठरत आहे. या प्रकरणासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी पोलिस स्टेशन जारावंडी येथे संपर्क केला असता ठाण्यातील संबंधितांनी आम्हाला अद्यापपर्यंत कोणतीही लिखित स्वरूपात फिर्याद मिळालेली नसल्याने गुन्हा नोंदविला नसल्याची माहिती दिली.
पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागात घर फोडून सोन्याचे दागिने चोरले
पोलिसांकडून कठोर कारवाईची गरज
जारावंडी येथे बोगस डॉक्टरी करताना सुनीता मंडल हिला रंगेहात पकडलेली बाब अत्यंत गंभीर आहे. वैद्यकीय पात्रता किवा अधिकृत नोंदणी नसताना ती उपचार करीत ती नागरिकांकडून अवैधपणे पैसे उकळत होती. हे केवळ फसवणूकच नव्हे तर मानवतेविरुद्धचा अपराध आहे. तिच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई होणे आवश्यक होते. मात्र तिला काही वेळातच सोडून देणे आणि अद्याप कोणतीही कठोर कारवाई न होणे हे केवळ व्यवस्थेचे अपयश नाही, तर अशा निर्लज्ज व बेकायदेशीर कृत्यांना अप्रत्यक्षरित्या संरक्षण देण्यासारखे असल्याचे बोलल्या जात आहे. ती रुग्णांच्या जिवाशी खेळत असताना त्यांच्यावर उशिरा होणारी कारवाई ही संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.