Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडाडले; म्हणाले, “संविधानाचा अपमान…”

Winter Session 2024: महायुतीचे सरकार स्थापन झालयानंतर गेल्या काही दिवसांत राज्यात हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. बीड आणि परभणी जिल्ह्यांत काही अशा घटना घडल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 16, 2024 | 03:22 PM
मागील सरकारमधील लाडकी बहीणसह इतर योजना बंद होणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं मोठं विधान

मागील सरकारमधील लाडकी बहीणसह इतर योजना बंद होणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर: विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान आजपासून नागपूरमध्ये सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्याआधी काल राजभवनात महायुतीच्या 39 आमदारांचा शपथविधी पार पडला. दरम्यान महायुतीचे सरकार स्थापन झालयानंतर गेल्या काही दिवसांत राज्यात हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. बीड आणि परभणी जिल्ह्यांत काही अशा घटना घडल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाष्य केले आहे.

बीडमध्ये मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. तर परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर एका माथेफिरुने संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. त्यानंतर परभणीत मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळेस जाळपोळ आणि दगडफेक देखील करण्यात आली होती. या दोन्ही घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात भाष्य केले आहे.

संविधानाचा अपमान कधीच सहन करणार नाही,
बीड-परभणीसारख्या गंभीर घटनांचे राजकारण करणे अयोग्य…
(विधानसभा, नागपूर | दि. 16 डिसेंबर 2024)#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024 pic.twitter.com/qfqEa00fyN — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2024

बीड आणि परभणीत घडलेल्या घटना अतिशय गंभीर आहेत. दोन्ही घटना सरकारने गांभीर्याने घेतल्या आहेत. अटकेची कारवाई झाली आहे. काही आरोपी फरार आहेत. त्यांना देखील लवकर अटक करण्यात येईल. आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. बीड, परभणी येथील दोन्ही घटना गंभीर आहेत. यावर सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही. अपमान करणाऱ्याना सोडले जाणार नाही. ” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हा फॉर्म्युला ठरवणार मंत्र्यांचं भविष्य

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा  विस्तार  राजभवनावर थाटामाटात  पार पडला.  महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पण मंत्र्यांच्या शपथविधीनंतर अनेक आमदारांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. आमदारांच्या  नाराजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर खुलासे केले.  महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आम्ही अडीच वर्षांचा मंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरवला असल्याचा खुलासा केला.

हेही वाचा: Maharashtra Cabinet Portfolio: हा फॉर्म्युला ठरवणार मंत्र्यांचं भविष्य;फडणवीस स्पष्टचं बोलले

मंत्री आपल्या विभागात योग्य पद्धतीने काम करत नाही,असे ऑडिटमध्ये लक्षात आले तर  त्यावेळी त्या मंत्र्याचा पुनर्विचार  केला जाईल. ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांना पक्षाकडून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. भाजपमध्ये ज्यांना मंत्रिपद दिले जात नाही. त्यांना पक्षाकडून वेगळी जबाबदारी देण्याचे निर्णय झालेले असतात. पण जे मंत्री ड्रॉप झाले आहेत त्यातील काही लोक परफॉर्मन्स नसल्यामुळेच ड्रॉप झालेले असतात, असंही फडणीसांनी स्पष्ट केलं. 16 डिसेंबरपासून विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरूवात होत आहे. याबाबत बोलताना  फडणवीस म्हणाले की, आगामी विधानसभेच्या अधिवेशनात 20 विधेयके मांडण्यात येणार असून, ही विधेयके राज्याच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाची ठरणार आहेत.

 

Web Title: Cm devendra fadnavis said strict action against accused of beed and parbhani violence nagpur winter session 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 03:07 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन
3

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”
4

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.