Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : तर्री पोह्यांचा नाश्ता, शेतकरी कुटुंबात भाऊबीज मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकरी कुटुंबात दिवाळी!

Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम करत दिवाळी साजरी केली.

  • By विवेक
Updated On: Nov 09, 2026 | 07:35 PM
Devendra Fadnavis Bhaubeej

Devendra Fadnavis Bhaubeej

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी
  • सकाळी तर्री पोह्यांचा नाश्ता, मुख्यमंत्र्यांची खास पसंती
  • बालपांडे कुटुंबाच्या आदरातिथ्याने भारावले मुख्यमंत्री
 

Nagpur News : दिवाळी म्हटलं की आनंद, फराळ आणि नातेवाईकांसोबतच्या गप्पा आल्याच! पण यंदाची दिवाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काहीशी वेगळी ठरली. दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकरी कुटुंबात मुक्काम केला. एवढंच नाही, तर घरच्या सदस्याप्रमाणे त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. सकाळी घरगुती तर्री पोह्यांचा आस्वाद घेतला आणि अरुणाताईंनी त्यांची भाऊबीजही केली.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी दिवाळी साजरी केली. सायंकाळी कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर त्यांनी घरातच मुक्काम केला. रात्री थंडी असल्याने कुटुंबीयांनी शेकोटी पेटवली होती. मात्र, शेकोटीचा आनंद घेण्याची संधी मिळाली नाही, याची खंत मुख्यमंत्र्यांनी गप्पांमध्ये बोलून दाखवली.

तर्री पोह्यांचा नाश्ता अन् मुख्यमंत्र्यांची आवड

सकाळी उठल्यानंतर बालपांडे कुटुंबातील महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेले तर्री पोहे मुख्यमंत्र्यांना वाढले. पोहे आपल्याला खूप आवडतात आणि आठवड्यातून किमान चार दिवस नाश्त्याला पोहे असतात, असं फडणवीस यांनी गप्पांच्या ओघात सांगितलं.

Ramdas Kadam on Sunil Tatkare : अजित पवारांच्या अपघातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात मोठी खळबळ

अरुणाताईंनी केली मुख्यमंत्र्यांची भाऊबीज

दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी बालपांडे कुटुंबात अभ्यंगस्नानही केलं. त्यानंतर अरुणाताईंनी भावाच्या नात्याने त्यांचं औक्षण केलं आणि भाऊबीज साजरी केली. यावेळी अरुणाताईंनी अगदी आपुलकीने, ‘दादा, पुढच्या वर्षी वहिनींना सोबत घेऊन या’, अशी विनंती केली. या छोट्याशा प्रसंगाने उपस्थितांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं.

सात महिन्यांच्या नारायणीची पहिली दिवाळी

बालपांडे कुटुंबातील सात महिन्यांची नारायणी हिची ही पहिलीच दिवाळी होती. मुख्यमंत्र्यांसोबत पहिला दिवाळसण साजरा झाल्याचा आनंद कुटुंबीयांनी व्यक्त केला. मोठी झाल्यावर नारायणीला हे फोटो दाखवणार असल्याचं तिचे वडील प्रवीण यांनी सांगितलं.

75 वर्षांच्या कमलाबाईंना दिलासा

याच भेटीदरम्यान 75 वर्षीय कमलाबाई मानेराव यांनी आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. बकरीपालनासाठी मदत आणि अपंग मुलाच्या आर्थिक मदतीची मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणांची तातडीने पडताळणी करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या निराधार अनुदानाबाबतही तपासणी करण्यास सांगितलं.

बालपांडे कुटुंबाचा निरोप घेताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आदरातिथ्याबद्दल आभार मानले. शेतकऱ्यांच्या अडचणी असूनही परिस्थितीशी लढण्याची त्यांची जिद्द प्रेरणादायी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Gokul President Election 2026 : ‘येताना चालत येतील, जाताना खांद्यावरून जातील’; राजू शेट्टींचा शासननियुक्त संचालकांना इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी कुठे साजरी केली?

    Ans: नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी केली.

  • Que: अरुणाताईंनी मुख्यमंत्र्यांना काय आग्रह केला?

    Ans: अरुणाताईंनी मुख्यमंत्र्यांची भाऊबीज केली आणि पुढच्या वर्षी दिवाळीसाठी वहिनींना सोबत घेऊन या, अशी आपुलकीची विनंती केली.

  • Que: मुख्यमंत्र्यांनी 75 वर्षीय कमलाबाईंच्या कोणत्या मागण्या ऐकून घेतल्या?

    Ans: कमलाबाईंनी बकरीपालनासाठी मदत आणि अपंग मुलासाठी आर्थिक सहाय्य मागितले. याशिवाय त्यांच्या निराधार अनुदानाच्या प्रकरणाची पडताळणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: Nagpur news devendra fadnavis diwali farmer family bhaubeej vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Diwali 2026
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री; कापूस आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी; मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.
1

Nagpur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री; कापूस आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी; मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.

Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री
2

Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री

Mumbai News: मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी! BMC चा मोठा निर्णय, नेमकं काय आहे कारण?
3

Mumbai News: मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी! BMC चा मोठा निर्णय, नेमकं काय आहे कारण?

Diwali In USA: ‘मामदानींनी रांगोळी काढली, अब्दुल सय्यद यांनी दिवा लावला’, अमेरिकन मुस्लिम नेत्यांची मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी
4

Diwali In USA: ‘मामदानींनी रांगोळी काढली, अब्दुल सय्यद यांनी दिवा लावला’, अमेरिकन मुस्लिम नेत्यांची मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.