Congress Vijay wadettiwar apologizes on controversial statement Pahalgam attack victim
नागपूर : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण देशातून रोष व्यक्त केला जात आहे. पहलगाममधील पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र पर्यटकांना धर्म विचारण्यात आल्याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संशय व्यक्त केला. वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. भाजप नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यावरुन जोरदार राजकीय टीका झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी माफी मागितली आहे.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “नितेश राणे यांनी काय म्हटलं त्याकडे मला लक्ष देण्याची गरज नाही. काल मी जे बोललो ते तोडून मोडून दाखविण्यात आलं. भारताला आपापसात लढविण्याचा षडयंत्र पाकिस्तानने रचलं आहे. पहिल्यांदा दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. सरकार आपलं अपयश लपविण्यासाठी माझं वक्तव्य तोडमोड करून दाखविले गेले. माझं वक्तव्य मागून पुढून न दाखविता तोडून मोडून दाखवण्यात आलं,” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विजय वडेट्टीवार यांनी टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना देखील प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “देशांमध्ये कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला आमची भूमिका स्पष्ट आहे मल्लिकार्जुन खर्गे यांनी जी भूमिका मांडली ती आमच्या पक्षाची भूमिका आहे. मी काल बोललो की अतिरेक्यांना पहिल्यांदा एवढा वेळ मिळाला त्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. तेवढेच दाखविण्यात आला माझी चॅनलला विनंती आहे माझं पूर्ण वक्तव्य दाखवा. देशाच्या सर्वभौमतेला, अखंडतेला खिंडार पाडण्यात त्यांना यश मिळवायचं होतं त्यामुळे त्यांनी असा कट रचला. अतिरेक्याला कुठला धर्म नसतो असं मी बोललो हा भारताला कमजोर करण्याचा हल्ला होता,” असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. “ते म्हणाले की, 26 वर्षानंतर पर्यटकांवर झालेला हल्ला आहे. हे अपयश लपविण्यासाठी माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं. ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला माझ्या बोलण्याने त्यांच्या भावना दुखावल्या असतील कुटुंबांना वेदना झाल्या असेल तर मी माफी मागतो. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, माझी भूमिका स्पष्ट आहे. अमित शाह येऊन गेले. पण तोडगा निघाला नाही तीन तिघाडा काम बिघाडा सुरू आहे. परस्पराविरोधात वक्तव्य केली जात आहे सरकार म्हणून महाराष्ट्रात एकत्रित काम करताना दिसत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना जनतेशी काही देणंघेणं नाही त्यांना सत्ता खुर्चीसाठी भांडण आहेत आणि त्यासाठी ते भांडत आहे,” असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे.
काय म्हणाले होते वडेट्टीवार?
वडेट्टीवार म्हणाले की, “हे लोक (सत्ताधारी) नेहमी भारत-पाकिस्तान असा जप करत असतात. त्यांनी आता सांगावं की या हल्ल्याची जबाबदारी कोणाची? हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश असल्याचं सरकारने स्वीकारावं. हे लोक काय बोलतात तर त्यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना मारले. अरे मुळात यासाठी वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जाऊन त्याच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला वेळ असतो का? यावरून बरेच वाद आहेत काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला, तर काहीजण म्हणत आहेत की असं काह घडलं नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किवा त्याची कुठलीही जात नसते,” असे मत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले होते. यावरुन राजकीय वाद निर्माण झाला होता.