"मला जीवनातून उठवण्याचा अनेकदा प्रयत्न, मात्र..."; फडणवीसांचा चांदीवाल अहवालावरून मोठा गौप्यस्फोट
नागपूर: महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पोलीस आयुक्त परबीरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्की चांदीवाल यांनी त्यांच्या अहवालात अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिलेली नाही, असा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून न्यायमूर्ती चांदीवाल यांनी या प्रकरणातील खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
चांदीवाल आयोगाने आपल्याला क्लीनचीट दिल्यामुळेट शासनाकडून आपला अहवाल सार्वजनिक केजा जात नाही, असा आरोप अनिल देशमुखांकडून वारंवार केला जातो.पण अनिल देशमुखांचा क्लीनचीटचा दावा फेटाळून लावत, योग्य पुरावे आयोगासमोर येऊ दिले नाही, असा दावाच खुद्द न्या. चांदीवाल यांनी केला आहे. दरम्यान यावर बोलताना चांदिवाल आयोगाचा अहवाल हा अत्यंत धोकादायक असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “चांदीवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धोकादायक आहे. त्यांनी अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिली नसल्याचे सांगितले आहे. हा अहवाल उद्धव ठाकरे यांचे सरकार असतानाच समोर आला आहे. अनेक पुरावे समोर दिसत होते. यांचे साटेलोटे होते, त्यामुळे अनेक पुरावे रेकॉर्डवर घेता आले नाहीत. त्यांनी मला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. मात्र ईश्वर आणि जनता माझ्या पाठीशी आहे.”
🕢 6.22pm | 13-11-2024 📍 Nagpur.
LIVE | Media interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/qQCejq8BQG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 13, 2024
अनिल देशमुख यांनी चांदिवाल अहवालामध्ये माझ्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले होते. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप झाले होते. हे आरोप महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिरसिंह यांनी केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. असे आरोप झाल्याने अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर ११ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी त्यांना तुरुंगात राहावे लागले होते. त्यातच आता चांदिवाल आयोगाच्या अहवालात नवीन खुलासे झाले आहेत, त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Justice Chandiwal Report: 100 कोटी प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीनचीट की आणखी काही? ; न्या. चांदीवांल यांचा गौप्यस्फोट
न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केले मोठे गौप्यस्फोट
– अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीसांनाच गोवण्याचा प्रयत्न केला शपथपत्रात सचिन वाझेने अजित पवार शरद पवार यांचीही नावे घेतली. पण नाव घेणाऱ्यांचे मनसुबे ओळखून आम्ही त्यांची नावे रेकॉर्डवर घेतली नाहीत.
– चांदीवाल आयोगाच्या अहवालत क्लीन चिट असा शब्दप्रयोग कऱण्यात आलेला नाही. उलट योग्य साक्षी पुरावे मिळाले नाही, असही चांदीवाल यांनी म्हटलं आहे.
– सचिन वाझे, परमबीर सिंग आणि अनिल देशमुख एकमेकांना भेटायचे आणि त्यानंतर वाझेनं साक्ष फिरवली, असही चांदीवाल यांनी म्हटलं आहे.
– साक्षी पुराव्यांसाठी जबरदस्ती करू शकत नाही, सत्य बाहेर येऊ नये महणून त्यांनी अनेक प्रयत्न केले, पण तेरी भी चूप मेरी भी चूप असं सगळं सुरू होतं.