
Nagpur: "प्रेमप्रकरणाचा जाब विचारल्याने संपवले!" नागपुरात सराईत गुंडाचा खूनी थरार; अल्पवयीन प्रेयसीच्या मामीचे अपहरण करून..
प्रियांका महेश सावरकर (वय ३५) असे हत्या झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे, तर अक्षय शालिकराम करोटे (वय ३०) असे मुख्य आरोपी सराईत गुंडाचे नाव आहे. आरोपी अक्षय याच्यावर यापूर्वीच खून, प्राणघातक हल्ले आणि घरफोडीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशातच आता सराईत करोटे याने थेट आपल्या अल्पवयीन प्रेयसीच्या मामीला संपवल्याने नागपूर शहर हादरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय करोटे याने दोन वर्षांपूर्वी मृत प्रियांका सावरकर यांच्या १६ वर्षीय अल्पवयीन भाचीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. या प्रेमप्रकरणाची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने त्या अल्पवयीन मुलीला दिली होती. दरम्यान, मुलीच्या आजीला या प्रकाराची कुणकुण लागली आणि तिने हा सर्व प्रकार प्रियांका सावरकर यांच्या कानावर घातला.
आरोपी अक्षयची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर प्रियांका यांनी अक्षयला बोलावून याबाबत जाब विचारला. आपल्याला जाब विचारल्याचा राग मनात धरून संतापलेल्या अक्षयने प्रियांका यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या अपहरणाचा कट रचला.
ठरलेल्या कटानुसार आरोपी अक्षयने प्रियांका यांचे अपहरण केले आणि त्यांना एका बंद खोलीत डांबून ठेवून त्यांच्यावर अत्यंत निर्घृणपणे जीवघेणा हल्ला केला. या बेदम मारहाणीत प्रियांका गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी अक्षय करोटे याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
Ans: नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे [cite: नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे].
Ans: प्रियांका महेश सावरकर (वय ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
Ans: आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल आणि अल्पवयीन मुलीसोबतच्या प्रेमप्रकरणाबद्दल मृत महिलेने त्याला जाब विचारल्याच्या राग मनात धरून त्याने हा कट रचला [cite: जाब विचारल्याचा राग मनात धरून संतापलेल्या अक्षयने प्रियांका यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या अपहरणाचा कट रचला].