Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : एनएमआरडीएची ताकद वाढली ;१६० पदांच्या पुनर्रचना प्रस्तावाला मंजुरी

Nagpur News : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (NMRDA) प्रशासकीय क्षमता वाढवण्यासाठी १६० पदांच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्राधिकरणातील मनुष्यबळ बळकट होऊन नागपूर महानगर प्रदेशातील विकासकामे, नियोजन आणि प्रशासन अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 13, 2026 | 03:20 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पारदर्शक प्रक्रियेतून भरती
  • आयुक्तांकडे राहतील अंतर्गत अधिकार
  • अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे एक पदही मंजूर
Nagpur News : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने एनएमआरडीएसाठी १६० पदांच्या सुधारित ‘आकृतिबंधा’ला अधिकृत मंजुरी दिली आहे. यासंदर्भात बुधवारी शासन निर्णय जारी केला. नव्या प्रशासकीय आकृतिबंधाअंतर्गत तांत्रिक आणि बिगर तांत्रिक पदांवर प्रतिनियुक्ती, पदोन्नती आणि थेट भरतीच्या माध्यमातून नियुक्त्या केल्या जाणार आहेत. सरकारने मंजूर केलेल्या एकूण १६० पदांमध्ये प्रशासकीय समतोल राखण्यासाठी विविध श्रेणींनुसार पदांचे विभाजन केले आहे.

Nagpur News : ‘नागपूर तो झांकी है, आझाद मैदान बाकी है’ ; कंत्राटदार उतरले रस्त्यावर

यात वर्ग ‘अ’मध्ये ४० पदे, गट ‘ब’मध्ये ५७ पदे आणि वर्ग ‘क’मध्ये ६३ पदे मंजूर केली आहेत. एनएमआरडीएची प्रमुख कामे लक्षात घेता अभियांत्रिकी विभागासाठी सर्वाधिक ६१ पदे मंजूर केली तर विकास परवानगी व नियोजन विभागासाठी ३८ पदे ठेवली आहेत. याशिवाय महसूल आणि जमीन व्यवस्थापन मजबूत करण्यासाठीही महत्त्वाची पदे मंजूर केली आहेत.

त्याव्यतिरिक्त प्रशासन व मनुष्यबळासाठी १२, जमीन व मालमत्ता विभागासाठी ११, अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकासाठी
९, लेखा व वित्त विभागासाठी ९, अग्निशमन विभागासाठी ७, विधी विभागासाठी ३ आणि जनसंपर्क विभागासाठी २ पदे मंजूर केली आहेत.

पारदर्शक प्रक्रियेतून भरती

राजपत्रित आणि प्रशासकीय स्तरावरील आयएएस, उपजिल्हाधिकारी, नगररचना अधिकारी या वरिष्ठ पदांवर राज्य सरकारच्या मूळ विभागातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली जाणार आहे. लिपीक, टंकलेखक आणि सहायक अभियंतासारखी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून थेट भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत.

Nagpur News : नागपूरच्या ग्रँडमास्टरची ऐतिहासिक कामगिरी ;रौनक ठरला शेल्डेमोंड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ विजेता !

आयुक्तांकडे राहतील अंतर्गत अधिकार

शासन निर्णयात स्पष्ट केले की, विविध विभागांमध्ये पदांचे हे विभाजन प्रशासकीय सोयीसाठी आहे. महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम २०१६च्या कलम १२(३) अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कामाचे वाटप आणि अंतर्गत बदल्यांचे अंतिम अधिकार प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तांकडेच राहतील.

Nagpur : महिंद्रा सुसाट, जेएसडब्ल्यू ‘ भटकला ‘ ; महिंद्राला मिळणार ८०० एकर जमीन !

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे एक पदही मंजूर

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचे एक पदही मंजूर झाले असून , नव्या प्रशासकीय आकृतिबंधात
महसूल विभागासाठी सरकारने १ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याव्यतिरिक्त २ उपजिल्हाधिकारी आणि २ तहसीलदारांची पदेही मंजूर केली आहेत.

 

 

Web Title: Nagpur news nmrda strengthened proposal to restructure 160 posts approved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Nagpur Collector
  • Nagpur District
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा
1

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?
2

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू
3

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत
4

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.