Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : ईडीकडून रेती माफियांची १६ कोटींची मालमत्ता जप्त; नागपूर-भंडाऱ्यात मोठी कारवाई

Nagpur News : नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात रेती माफियांविरोधात ईडीने मोठी कारवाई करत १६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. अवैध रेती उत्खनन आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी झालेल्या या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 20, 2026 | 03:24 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • आतापर्यंत २० कोटी पेक्षा अधिकची मालमत्ता जप्त 
  • अंबाझरी पोलिस ठाण्यातील एफआयआर वरून तपास
  • मध्य प्रदेशातील घाटांच्या नावाने बनावट ई-टीपी
Nagpur News : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नागपूर उपविभागीय कार्यालयाने नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांतील विविध रेती घाटांवर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ च्या तरतुदींनुसार ईडीने अंदाजे १६.२३ कोटींची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये आलिशान वाहने, जमिनीचे भूखंड, इमारती, फ्लॅट,व्यावसायिक दुकाने आणि फार्महाऊस यांचा समावेश आहे. ईडीच्या तपासात अवैध रेती उत्खननातून मिळालेल्या गुन्हेगारी उत्पन्नाचा वापर करून संघटित सिंडिकेटने या मालमत्ता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे खरेदी केल्याचे समोर आले आहे.

आतापर्यंत २० कोटी पेक्षा अधिकची मालमत्ता जप्त

प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीने यापूर्वी विविध ठिकाणी छापे आणि शोधमोहीम राबवून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे, नोंदी, डिजिटल उपकरणे आणि रोख जप्त केली होती. याशिवाय बँक खात्यांतील शिल्लक रक्कम, महागडी वाहने, जेसीबी आणि पोकलेन मशीनसारखी जंगम मालमत्ताही गोठवली होती. १६.२३ कोटींच्या ताज्या जप्तीमुळे या प्रकरणात जप्त, गोठवलेल्या आणि तात्पुरत्या स्वरूपात जप्त केलेल्या मालमत्तांचे एकूण मूल्य २० कोटीहून अधिक झाले आहे. ईडीच्या अंदाजानुसार, या सर्व मालमत्तांचे सध्याचे एकूण बाजारमूल्य ५० कोटींपेक्षा अधिक आहे.

Nagpur News : दुर्बल घटकांच्या निधीवरून सभापती बॅकफूटवर; ५५ कोटींच्या प्रस्तावांना स्थगिती; सर्व पत्रे रद्द करण्याचे निर्देश

अंबाझरी पोलिस ठाण्यातील एफआयआर वरून तपास

शहरातील सदर आणि अंबाझरी पोलिस ठाण्यांमध्ये नरेंद्र पिंपळे आणि इतर आरोपींविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला, बनावट आणि खोट्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पासचा वापर करून अवैध रेती उत्खनन, वाहतूक आणि विक्री करण्यासाठी संघटित रॅकेट चालविल्याचा आरोप आरोपींवर आहे.

Nagpur News : कचरा कंत्राटदारांची गच्छंती अटळ; संकलनातील अनियमिततेचा हिशेब चुकला

मध्य प्रदेशातील घाटांच्या नावाने बनावट ई-टीपी

ईडीच्या सखोल तपासात रेती माफियांच्या कारवायांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संघटित रेती माफिया सिंडिकेट, वाहतूकदार आणि इतर साथीदारांच्या संगनमताने नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांतील लिलाव झालेल्या रेती घाटांमधून मंजूर मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात अवैध रेती उत्खनन केले जात होते.

अवैध रेतीची वाहतूक आणि विक्री कायदेशीर असल्याचे भासवण्यासाठी सिंडिकेटकडून मध्य प्रदेशातील कायदेशीररीत्या भाडेपट्टवाने दिलेल्या रेती घाटांच्या नावाने जारी केलेले बनावट इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पास (ई-टीपी) खरेदी केले जात होते. प्रत्येक पाससाठी ६ हजार ते १० हजार रुपये मोजले जात होते. या बनावट ई-टीपीच्या आधारे रेती मध्य प्रदेशातील अधिकृत घाटावरून आणल्याचे भासवले जात होते.

ई-टीपीवर नमूद केलेल्या वाहनांचे नोंदणी क्रमांक खरे होते आणि ते सरकारी पोर्टलवरही उपलब्ध होते. मात्र, ईडीने या वाहनांच्या जीपीएस डेटाचे विश्लेषण केल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला, जीपीएस डेटावरून संबंधित वाहने मध्य प्रदेशातील कथित रेती घाटांवर कधीही गेली नसल्याचे तसेच ई-टीपीमध्ये नमूद केलेल्या मार्गावरूनही त्यांनी प्रवास केला नसल्याचे स्पष्ट झाले.उलट ही वाहने नागपूर आणि आसपासच्या परिसरातील अवैध रेती उत्खननाच्या ठिकाणी सतत फिरत असल्याचे तपासात आढळले. अवैध रेतीचा मूळ सौत लपवणे, रॉयल्टी आणि कर चुकवणे तसेच सरकारी महसुलाचे मोठे नुकसान करणे, या उद्देशाने हा प्रकार रचल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले आहे.

 

Web Title: Nagpur ed seizes 16 crore sand mafia assets nagpur bhandara cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • Sand Mafia

संबंधित बातम्या

Mumbai Railway Demolition: मुंबईत पुन्हा बुलडोजर ॲक्शन! प्रभादेवीत १०० कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर,पाहा photos
1

Mumbai Railway Demolition: मुंबईत पुन्हा बुलडोजर ॲक्शन! प्रभादेवीत १०० कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर,पाहा photos

Jalgaon News: जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी, मेळाव्यातच नेत्यांमध्ये खडाजंगी
2

Jalgaon News: जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी, मेळाव्यातच नेत्यांमध्ये खडाजंगी

Latur News: लातूरच्या दुष्काळी परिस्थितीची राज्यपालांकडून पाहणी; भूजल पुनर्भरणासाठी प्रशासनाला सूचना
3

Latur News: लातूरच्या दुष्काळी परिस्थितीची राज्यपालांकडून पाहणी; भूजल पुनर्भरणासाठी प्रशासनाला सूचना

Chandrapur News: चंद्रपूरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! आधी खरीपने कंबरडे मोडले, आता रब्बीवर दुष्काळाचे सावट
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! आधी खरीपने कंबरडे मोडले, आता रब्बीवर दुष्काळाचे सावट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.