Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; अपहरण करून निर्जनस्थळी नेलं अन् नंतर…

करी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. काही काळापूर्वी त्याने एका तरुणीकडून नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत ३० हजार रुपये घेतले होते. मात्र, तिला नोकरी मिळाली नाही. पैसे परत मागितल्यानंतर शुभम टाळाटाळ करू लागला. या प्रकाराची माहिती संबंधित तरुणीने तिच्या मैत्रिणीला आणि सावत्र भावाला दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 19, 2026 | 12:15 PM
पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; अपहरण करून निर्जनस्थळी नेलं अन् नंतर...

पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; अपहरण करून निर्जनस्थळी नेलं अन् नंतर...

Follow Us
Follow Us:
  • पैशाच्या वादातून नागपुरात ३० वर्षीय तरुणाचे अपहरण करून मारहाण.
  • निर्जनस्थळी बेदम मारहाण केल्यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल केले.
  • मृत तरुण दिघोरी येथील रहिवासी शुभम असून तो ऑनलाइन सेवा केंद्र चालवत होता.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच नागपुरात पैशाच्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. तरुण-तरुणींच्या एका गटाने संबंधित तरुणाचे अपहरण करून त्याला निर्जनस्थळी नेले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सध्या याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृताची ओळख दिघोरी येथील रहिवासी शुभम (वय ३०) अशी पटली आहे.

शुभम दिघोरी परिसरात ऑनलाईन सेवा केंद्र चालवत होता. या केंद्रातून तो विविध सरकारी योजना आणि नोकऱ्यांसाठी अर्ज भरून देण्याचे काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. काही काळापूर्वी त्याने एका तरुणीकडून नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत ३० हजार रुपये घेतले होते. मात्र, तिला नोकरी मिळाली नाही. पैसे परत मागितल्यानंतर शुभम टाळाटाळ करू लागला. या प्रकाराची माहिती संबंधित तरुणीने तिच्या मैत्रिणीला आणि सावत्र भावाला दिली.

दरम्यान, मंगळवारी रात्री ती तरुणी मैत्रीण, भाऊ आणि त्याच्या काही मित्रांसह शुभमच्या कार्यालयात पोहोचली. तेथे पैशांवरून वाद झाला. त्यानंतर सर्वांनी मिळून शुभमला मारहाण केली. पुढे त्याला जबरदस्तीने वाहनात बसवून आउटर रिंग रोडवर नेण्यात आले.

मारहाणीत शुभम बेशुद्ध

पांजरी टोल नाक्याजवळील एका निर्जनस्थळी त्याला पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शुभम बेशुद्ध पडला. त्यानंतर संबंधित तरुण आणि तरुणी त्याला तेथेच सोडून निघून गेले. सुमारे दोन तासांनंतर ते पुन्हा त्याच ठिकाणी आले. शुभम बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याचे पाहून त्यांनी त्याला वाहनातून वैद्यकीय रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत रुग्णालय प्रशासनाने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली.

FAQ

Q1. नागपुरात तरुणाची हत्या कशातून झाली?
प्राथमिक माहितीनुसार पैशाच्या वादातून तरुणावर हल्ला करण्यात आला.

Q2. मृत तरुणाचे नाव काय आहे?
मृत तरुणाचे नाव शुभम असून तो ३० वर्षांचा होता आणि दिघोरी परिसरात राहत होता.

Q3. शुभम काय काम करत होता?
शुभम दिघोरी परिसरात ऑनलाइन सेवा केंद्र चालवत होता. विविध सरकारी योजना आणि नोकऱ्यांसाठी अर्ज भरून देण्याचे काम तो करत होता.

Web Title: Youth murdered over a money dispute incident in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur News

संबंधित बातम्या

मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा, पुण्यात विक्रीचा डाव; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई
1

मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा, पुण्यात विक्रीचा डाव; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लातूरमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर सील
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लातूरमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर सील

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानसभा क्षेत्रातील त्रिमूर्तीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांना घरं सोडण्याची वेळ
3

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानसभा क्षेत्रातील त्रिमूर्तीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांना घरं सोडण्याची वेळ

Nagpur News : दुर्बल घटकांच्या निधीवरून सभापती बॅकफूटवर; ५५ कोटींच्या प्रस्तावांना स्थगिती; सर्व पत्रे रद्द करण्याचे निर्देश
4

Nagpur News : दुर्बल घटकांच्या निधीवरून सभापती बॅकफूटवर; ५५ कोटींच्या प्रस्तावांना स्थगिती; सर्व पत्रे रद्द करण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.