Nagpur News: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची अद्याप घोषणा झालेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर पक्षप्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पक्षबांधणी सुरू असून वेगवेगळे पक्षप्रवेश सुरू आहेत. अशातच एका सराईत गुंडाने शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकरने शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाचा संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत युवराज माथनकर एकनाथ शिंदे यांच्या पाया पडताना दिसत आहे. एकनात शिंदे यांच्या पाया पडून त्याने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण युवराज माथनकरवर लूट, खंडणी आणि हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांतर्गत तो काही वर्षे तुरुंगातही राहिला आहे. त्याच्या टोळीवर मकोका गुन्हाही लागला होता. अलीकडेच काही गुन्ह्यात त्याला निर्दोष मुक्त कऱण्यात आले आहे.
अंग प्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्या भाविकांना ‘नो एन्ट्री’; आई एकविरा देवी मंदिरात ड्रेसकोड लागू
नागपुरात आज शिवसेनेच्या शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यादरम्यान युवराज माथनकर नावाच्या व्यक्तीच्या प्रवेशावर विशेष लक्ष वेधले गेले. नागपुरात त्याची ओळख एक सराईत गुंड म्हणून असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याच माथनकरला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश देण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र, या संदर्भात स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी माथनकरच्या पक्षप्रवेशाच्या दाव्याचे खंडन केले असून, तो पक्षात प्रवेश घेतल्याचं फेटाळलं आहे.
नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. याच गर्दीत युवराज माथनकर या वादग्रस्त व्यक्तीचाही सहभाग असल्याचे समोर आले. मात्र, स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्याच्या प्रवेशाच्या बातमीचे खंडन करत, त्याने अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला नसल्याचा दावा केला आहे.
पृथ्वी बदलतेय तीच रूप! इथिओपियामध्ये शास्त्रज्ञांना जमिनीखाली ऐकू आले ‘हृदयाचे ठोके,
माथनकर काही काळ कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिला, मात्र पक्षप्रवेशानंतर लगेचच निघून गेला. त्यामुळे त्याचा पक्षप्रवेश झाला की नाही, याबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली.या पार्श्वभूमीवर कार्यक्रमानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितले की, “स्थानीय पातळीवर कोणाला पक्षात घ्यायचे, हा निर्णय स्थानिक नेतृत्व घेतं. कुठलीही वादग्रस्त व्यक्ती पक्षात येणार नाही, याची जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांची आहे.”