Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसावरी जगदाळेंना शासकीय नोकरी देण्याचे निर्देश दिले आहेत. शिंदेंच्या निर्णयानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2026 | 06:28 PM
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

Follow Us
Follow Us:

मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यामध्ये, महाराष्ट्रातील देखील काही पर्यटकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य, आप्तेष्ट, जवळचे नातेवाईक गमावले होते. त्यामध्ये, पुण्यातील संतोष जगदाळे यांचाही या भ्याड हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली होती. मात्र, जवळपास 1 वर्षे होत आले असतानाही त्यांना नोकरी मिळत नसल्याचे समोर आले. खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत ट्विट करत शासनाचे लक्ष वेधल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसावरी जगदाळेंना शासकीय नोकरी देण्याचे निर्देश दिले आहेत. शिंदेंच्या निर्णयानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

 

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या निर्णयाचे स्वागत करत आभार व्यक्त केले आहेत. डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले की, दहशतवादी हल्ल्यात कुटुंबप्रमुख गमावलेल्या कुटुंबाला शासनाकडून मिळणारा हा दिलासा अत्यंत महत्त्वाचा असून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक प्रशासकीय अडचणींवर मात करून हा निर्णय तडीस नेला आहे. अशा संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण भूमिकेमुळे पीडित कुटुंबाला आधार मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून आसावरीच्या शिक्षणाला समकक्ष असे पद निर्माण करून तिला सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले आहेत. शासन विशेष बाब म्हणून सहानुभूतीपूर्वक या नियुक्तीला मंजुरी देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरच आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असून, या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्तांना दिले आहेत. शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी आसावरी हिला बोलवून तिच्याशी बोलून तिच्या शिक्षणाला समकक्ष असे पद महानगरपालिकेत निर्माण करून तिला सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले. तसेच शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, जगदाळे कुटुंबीयांना मुलीच्या नोकरीचा आधार मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

Web Title: Neelam gorhe has thanked deputy chief minister eknath shinde for his decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Neelam Gorhe
  • pune news

संबंधित बातम्या

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
1

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
2

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
3

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद
4

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.