Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी

नागपूर मनपात चार वर्षे अधिकाऱ्यांचे राज्य आणि कोरोनामुळे ठप्प कामांमुळे शहराची दूरवस्था झाल्याचा आरोप संजय महाकाळकर यांनी केला. श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत विकासकामांतील त्रुटींवर त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 14, 2026 | 03:47 PM
nagpur (फोटो सौजन्य: social media)

nagpur (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सात वर्षांत नागपूरची स्थिती खालावल्याचा आरोप
  • प्रशासक राजवटीवर आणि विकासकामांवर तीव्र टीका
  • 24×7 पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापन अपयशी असल्याचा दावा
  • श्वेतपत्रिका काढण्याची लवकरच मागणी
  • प्रश्न न सुटल्यास गडकरी-फडणवीसांकडे पाठपुरावा करण्याचा इशारा
नागपूर: महानगरपालिकेमध्ये चार वर्षे ना सत्ताधारी होते, ना विरोधक, फक्त अधिकाऱ्यांचेच राज्य होते. या काळात शहराची नेमकी काय अवस्था झाली, कोणते निर्णय कसे घेतले गेले आणि त्याचे नागपूरकरांवर काय परिणाम झाले, याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी लवकरच करणार असल्याचे मनपातील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी सांगितले, प्रशासक राजवटीच्या आधी जवळपास तीन वर्षे कोरोनामुळे कामे ठप्प होती. या सात वर्षांत शहराची दूरवस्था झाल्याचेही ते म्हणाले. शुक्रवारी महाकाळकर यांनी ‘नक्राष्ट्र कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मनमोकळी चर्चा करीत शहरातील प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली. आगामी काळात नागपूर कसे असावे, याचा स्पष्ट नकाशा आमच्या डोक्यात आहे. त्या दूष्टीने सत्ताधाऱ्यांना काम करण्यास भाग पाडू, असे ते ठामपणे म्हणाले. शहरात विकासकामे होत आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली नागपूरकरांची ससेहोलपट होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील प्रमुख तीन-चार रस्ते

विविध कामांमुळे सतत ब्लॉक आहेत. उड्डाणपूल आणि रस्ते कामांचा थेट परिणाम नागरिकांवर होत आहे. कामे करताना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवले गेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. २४ बाय ७ पाणीपुरवठ्याची घोषणा अपयशी ठरल्याचा दावा करीत त्यांनी कचरा व्यवस्थापनावरही टीका केली. दोन कचरा संकलन एजन्सी असूनही, अनेक भागांत दोन-दोन, तीन-तीन दिवस गाड्या येत नाही, असा आरोप त्यांनी केला, शहराच्या ज्येष्ठ नेत्यांनी फटकार लावल्यानंतरही एसंजीजवर कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी अधोरेखीत केले, अतिक्रमण सुरुवातीला रोखले जात नाही आणि ते वाढल्यानंतर सामाजिक प्रश्न बनतो, ही मोठी समस्या बनली आहे. सीताबर्डीतील हॉकर्सच्या प्रश्नावरही त्यांनी प्रशासनावर थेट हल्ला चढवला. प्रशासक राजवटीवर टीका करताना त्या चार वर्षांत अधिकाऱ्यांच्या “अंगातच आली होती असा टोला त्यांनी लगावला. आगामी काळात नागपूरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहात आणि बाहेरही लढा देऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

तीन दिवस एकही उपायुक्त नाही : सत्ताधाऱ्यांच्या स्वागतासाठी उपायुक्तांमध्ये चढाओढ लागली होती. मात्र, विरोधी पक्षनेते झाल्यानंतर तीन दिवस एकही उपायुक्त भेटीस आला नाही, याची खंत संजय महाकाळकर यांनी व्यक्त केली. प्रशासनाची ही भूमिका लोकशाही व्यवस्थेला शोभणारी नसल्याचे त्यांनी नमूद केले, गुंड अजीमवर एमपीडीए नागपूर, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सीताबडीं ठाण्यांतर्गत गंभीर गुन्ह्यात सक्रिय गुंड अजीम कादिर बेग (२७, रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी) याच्यावर एमपीडीए लावून स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

Delhi Crime: व्हॅलेंटाईन्सपूर्वी धक्का! हॉटेलमध्ये प्रेमीयुगुलात वाद; रागाच्या भरात तरुणीची चौथ्या मजल्यावरून मारली उडी

त्याला अटक करून मध्यवर्ती कारागृहात टाकले. लवकरच छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह, हर्सल येथे दाखल केले जाईल. अजीमविरुद्ध सीताबर्डी, सोनेगाव, कळमना, बजाजनगर, पारडी, सदर आणि गणेशपेठ पोलिसांत अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २०१७ मध्ये त्याच्यावर प्रतिबंधक कारवाईही केल्यावरही झोन २ च्या पोलिस उपायुक्तांनी त्याला एक वर्षासाठी तडीपार केले होते. २०२४ मध्येही त्याच्याकडून २ वर्षासाठी चांगल्या वागणुकीचे बंधपत्र लिहून घेतले होते. मात्र, तो सतत गुन्हेगारीत सक्रिय होता.

हातठेला चोरला नागपूर, चना-पोहा विक्री करणाऱ्याचा हातठेलाच चोरांनी लंपास केल्याची घटना सक्करदरा पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी राहुल अमृत खरे (३०, रा. नेहरूनगर) याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे.

आरडाओरड नव्हे, नियमाने लढा
संजय महाकाळकर शांत आहे, विरोधी पक्षनेते आक्रमक असावा लागतो, अशी चर्चा महानगरपालिकेच्या वर्तुळात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता, महाकाळकर म्हणाले, केवळ आरडाओरड करूनच कामे होत नाही. शांतपणे, नियमांच्या चौकटीत राहूनही प्रश्न सोडवता येतात. मात्र, गरज भासल्यास ‘आक्रमकता ही दाखवून देऊ, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना एकप्रकारे इशाराच दिला.

…तर गडकरी-फडणवीसांकडेही धाव
शहराचा विकास आणि समस्यामुक्त नागपूर हा आमचा अजेंडा आहे. सभागृहात प्रश्न मांडूनही न सुटल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याकडेही पाठपुरावा करू, असे महाकाळकर यांनी स्पष्ट केले, पक्षीय राजकारणापेक्षा नागपूरकरांचा प्रश्न महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Pandharpur Crime: पंढरपुरातील मायलेकाच्या दुहेरी हत्येचा अखेर उलगडा; 8 महिन्यांनंतर आरोपी गजाआड

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाकाळकरांनी मुख्य आरोप काय केला?

    Ans: अधिकाऱ्यांच्या राजवटीत आणि कोरोनामुळे कामे ठप्प राहिल्याने नागपूरची दूरवस्था झाल्याचा आरोप.

  • Que: त्यांनी कोणती मागणी केली?

    Ans: शहराच्या स्थितीवर श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी.

  • Que: नागरिकांच्या समस्या कोणत्या मांडल्या?

    Ans: रस्ते कामे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमणाचे प्रश्न.

Web Title: Sanjay mahakalkar attacks municipal corporation nagpurs condition has deteriorated in seven years demands for white paper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Nagpur

संबंधित बातम्या

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा
1

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा

Nagpur News: कर भरूनही नशिबी नरकयातना! उत्तर नागपुरात धुरामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
2

Nagpur News: कर भरूनही नशिबी नरकयातना! उत्तर नागपुरात धुरामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

Nagpur: कोट्यवधींची थकबाकी; तरीही मुदतवाढ; सरकारच्या वाळू व्यवसायाच्या योजना अपयशी
3

Nagpur: कोट्यवधींची थकबाकी; तरीही मुदतवाढ; सरकारच्या वाळू व्यवसायाच्या योजना अपयशी

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…
4

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.