नागरगावात कार-ट्रकचा भीषण अपघात; बाप-लेकींसह मामाचा जागीच मृत्यू
नेमकं प्रकरण काय आहे?
पंढरपूर शहरातील लखन संजय जगताप या तरुणाची भर वस्तीतील त्याच्या घरात गुसून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर तब्बल १६ वार करण्यात आले. त्याच्यावर वार करताना त्याच्या आईने पहिले आणि आई सुरेखालाही नऊ वार करून ठार मारण्यात आले. अवघ्या दहा मिनिटांत हे दुहेरी हत्याकांड करून आरोपी फरार झाले होते.
कसा केला तपास?
या प्रकरणात घटनास्थळी कोणताही CCTV पुरावा उपलब्ध नव्हता. तपासाचे ठोस धागेदोरे मिळत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सुरुवातीपासून तपासाला नव्याने सुरुवात केली. तब्बल दीड हजार फोन कॉल्स आणि इंटरनेट रेकॉर्ड्स तपासून पाहण्यात आले. याच डिजिटल तपासातून संशयाची साखळी तयार होत गेली.
सुरुवातीला गोंधळात टाकले नंतर
हत्येसाठी गवत कंपन्यांच्या मशीनच्या पायांपासून खास हत्यार तयार करण्यात आले होते. पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी आरोपींपैकी एक विशाल शिंदे नाईक याने स्वतःच पोलीस ठाण्यात फोन करून खुनाची माहिती दिली होती. हत्येनंतर घरातील ५५ इंची टीव्ही आणि काही साहित्य नेले होते. मात्र हा चोरीचा प्रकार नसून पोलिसांचा दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम चोरीचा बनाव केल्याचे तपासात समोर आले.
या हत्याकांडात एका अल्पवयीन मुलाने आरोपींना मदत केल्याचेही समोर आले. हत्येच्या वेळी पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीशी पोलिसांच्या खबऱ्याने मैत्री करून त्याच्याकडून महत्वाची माहिती मिळवली. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. या दुहेरी हत्याकांडात विशाल शिंदे नाईक याने अथर्व शिंदे नाईक यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी हत्येनंतर राजस्थानला रवाना
आरोपी हे हत्या केल्यांनतर राजस्थानला कामासाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. हत्येच्या वेळी विशालचा मोबाईल फोन सुमारे एक तास बंद होता. फोन बंद करण्यापूर्वी त्याने सहआरोपी अथर्वशी संपर्क साधल्याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले. याच आधारावर दोघांनाही अटक करण्यात आली.
आरोपी अटकेत
हत्या केल्यानंतर अधिक चौकशीत आरोपींनी चोरी केलेला ५५ इंची टीव्ही आणि हत्येसाठी वापरलेले हत्यार चंद्रभागा नदीपात्रात फेकल्याची कबुली दिली. पोलिसांनी चंद्रभागेतून हे साहित्य जप्त केले आहे. आरोपी आणि जगताप कुटुंबीय हे शेजारी राहत होते. त्यांच्यातील वैमनस्य हेच खुनामागील प्रमुख असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दोघांना नायायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. IPS अधिकारी प्रशांत डगळे यांनी अवघ्या एका महिन्यातच संपूर्ण हत्येचा उलगडा केला आहे.
Ans: घटनेनंतर आठ महिन्यांनी सखोल तपासातून उलगडा झाला.
Ans: फोन कॉल रेकॉर्ड्स, इंटरनेट डेटा आणि खबऱ्याची माहिती निर्णायक ठरली.
Ans: घरातून साहित्य चोरीला गेल्याचा बनाव करून तपास चुकीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला.






