
'लव्ह यू, बाळा!''माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला...', नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी नानांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मुंढे यांनी लिहिले, “नाना पाटेकर आता आपल्यात नाहीत. मी केवळ एक असामान्य कलाकारच नाही, तर एक विलक्षण माणूस आणि माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला आहे. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने आणि आपुलकीने प्रत्येकाच्या मनाला स्पर्श केला होता.” अवघ्या आठ दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांच्यासोबत आपले बोलणे झाले होते, असेही त्यांनी सांगितले. त्या संभाषणातील नानांचे शेवटचे शब्द ‘लव्ह यू, बाळा’ असे होते. हेच आपले अखेरचे संभाषण ठरेल, याची कल्पनाही नव्हती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
काही माणसे आपल्या मागे केवळ आठवणी ठेवून जातात, तर काही माणसे आपल्या आयुष्यात स्वतःचा एक भाग कायमचा ठेवून जातात. नाना हे त्यापैकीच एक होते, अशा शब्दांत मुंढे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “अलविदा, माझ्या मित्रा! तुझी उणीव कायम जाणवत राहील. तू सदैव आठवणीत राहशील,” असे म्हणत त्यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘प्रहार’, ‘वेलकम’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधून नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयासोबतच त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्य केले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीसह सामाजिक क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे.
Nana Patekar is no more. I have lost not merely an exceptional artist, but an extraordinary human being and a dear friend , someone whose warmth and affection touched everyone around him. We spoke just eight days ago. I could never have imagined that it would be our last conversation. His last words to me were: “Love you, Bala.” Those words will stay with me for the rest of my life. Some people leave behind memories. A few leave behind a part of themselves in our lives. Nana was one of them. Goodbye, my friend. You will be deeply missed, and forever remembered.
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) October 8, 2026