Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाना पटोलेंचा वाल्मिक कराडवर गंभीर आरोप; ‘त्या’ मंत्र्यालाही हटवण्याची मागणी

राजकीय आशिर्वादाने महाराष्ट्रात सुरु असलेल्या गुंडाराजचा कायमचा बिमोड करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 19, 2024 | 04:14 PM
नाना पटोलेंचा वाल्मिक कराडवर गंभीर आरोप; 'त्या' मंत्र्यालाही हटवण्याची मागणी

नाना पटोलेंचा वाल्मिक कराडवर गंभीर आरोप; 'त्या' मंत्र्यालाही हटवण्याची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या असून या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशिर्वादाने महाराष्ट्रात सुरु असलेल्या गुंडाराजचा कायमचा बिमोड करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

विधानसभेत परभणी व बीड जिल्ह्यातील घटनांवरील चर्चेत बोलताना नाना पटोले यांनी सरकारचे वाभाडे काढले, ते पुढे म्हणाले की, महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात गुंडगिरीला संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला आहे. बीडमधील वाल्मिक कराडवर ३०२ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याला पोलीस संरक्षण दिले, त्याला पोलीस संरक्षण देण्याची शिफारस करणारा कोण? त्याला कशासाठी पोलीस संरक्षण दिले? परळीत आंधळे व गीते यांच्यात गोळीबार झाला, त्यात गीते यांचा मृत्यू झाला, या प्रकरणात वाल्मिक कराड या व्यक्तीचा संबंध आहे. या घटनेवेळी पीआय महाजन व पाटील नावाचे पीएसआय त्या भागात कार्यरत होते. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या केज विभागात हेच महाजन व पाटील पोलीस विभागात कार्यरत आहेत. वाल्मिक कराडच्या आदेशाने पोलीस विभागातील बदल्या होत आहेत का? बीडची घटना अत्यंत गंभीर असून, त्याला राजकीय आशिर्वाद आहे. मंत्रिमंडळातील एक मंत्री यात सहभागी आहे अशी चर्चा आहे, त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर केले पाहिजे.

परभणीची घटना ही भीमा कोरगाव सारखीच आहे. घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी शेकडो लोक रस्त्यावर जमा झाले, दुकाने बंद झाली. पोलिसांनी घटना झाली त्यावेळीच योग्य ती कारवाई केली असती तर पुढील घटना घडल्या नसत्या. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करुन निरपराध लोकांवर लाठीचार्ज केला, जनावरापेक्षाही वाईट पद्धतीने मारहाण केली. पोलिसांना लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? परभणीतील घटना सरकार प्रायोजित होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सोमनाथ सुर्यवंशी हा पोलीस लाठीचार्जचा व्हीडिओ शूट करत होता त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली व पोलीस कोठडीत बेदम मारहाण केली, सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली पण सरकारने अद्याप एकाही पोलिसावर कारवाई केली नाही.

बीडच्या घटनेत वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून दोन दिवसात २०० खोटे गुन्हे दाखल केले आहेत, तोच शासन चालवतो. पोलीस काय करतात? पोलीस शासनाचे ऐकतात का गुंडाचे? मुख्यमंत्री सक्षम आहेत तरिही राज्यात अनागोंदी कारभार चालतो कसा? बीडमध्ये एका गुंडाची दहशत आहे, त्याचा ‘आका’ कोण? हे समजले पाहिजे. महाराष्ट्रात फोफावलेल्या या गुंडाराजचा आता अंत झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार कायम राहिला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.

भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवर सातत्याने अत्याचार होत आहेत, त्यांना न्याय मिळत नाही. पवईतील जयभीमनगर झोपडपट्टी ऐन पावसाळ्यात मुंबई महानगरपालिका, बिल्डर हिरानंदानी व पोलीसांच्या मदतीने तोडून टाकली. या प्रकरणी सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या अहवालात पोलीस, बीएमसी प्रशासन व बिल्डर हिरानंदानीला दोषी ठरवले आहे पण आजही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही असेही नाना पटोले यांनी निदर्शनास आणून दिली.

हे सुद्धा वाचा : खळबळजनक! पुण्यात खिडकी उचकटून चोरटे घरात घुसले, पण पुढे जे घडलं…

आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी मविआचे आंदोलन..

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील भाषणात अवमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी नागपूरमध्ये आंदोलन केले. नागपूर येथील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मविआच्या आमदारांनी या आंदोलनाला सुरुवात केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरही आंदोलन करून भाजपा व अमित शाह यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title: Nana patole has made serious allegations against valmik karad nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 04:14 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • Nana patole
  • Santosh Deshmukh Murder
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Anjali Damania Marathi News : “धनंजय मुंडेंना ड्रामॅटिकमध्ये नॅशनल अवॉर्ड द्या…; अंजली दमानियांचा खोचक टोला
1

Anjali Damania Marathi News : “धनंजय मुंडेंना ड्रामॅटिकमध्ये नॅशनल अवॉर्ड द्या…; अंजली दमानियांचा खोचक टोला

Dhananjay Munde News: मुंबईत १६ कोटींचे आलिशान घर, तरीही सोडवेना सरकारी बंगला…; धनंजय मुंडे खोटं बोलले?
2

Dhananjay Munde News: मुंबईत १६ कोटींचे आलिशान घर, तरीही सोडवेना सरकारी बंगला…; धनंजय मुंडे खोटं बोलले?

Dhananjay Munde News: राजीनाम्याच्या पाच महिन्यांनंतरही धनंजय मुंडेंना सोडवेना ‘सातपुडा’ बंगला; ४२ लाखांचा दंड प्रलंबित
3

Dhananjay Munde News: राजीनाम्याच्या पाच महिन्यांनंतरही धनंजय मुंडेंना सोडवेना ‘सातपुडा’ बंगला; ४२ लाखांचा दंड प्रलंबित

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद
4

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.