Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील ‘हे’ विमानतळ अखेर करावे लागले बंद; प्रवाशांना मोठा फटका बसणार

मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांशी नांदेडला जोडणाऱ्या सेवा सुरू झाल्याने मराठवाड्याच्या प्रगतीला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे भाडेतत्त्वावर संचालन दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 24, 2025 | 08:00 AM
नांदेड विमानतळावर सेवांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला

नांदेड विमानतळावर सेवांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला

Follow Us
Close
Follow Us:

नांदेड : महाराष्ट्रात सध्या अनेक विमानतळ आहेत. या विमानतळावरून अनेक विमानांची उड्डाणं होत असतात. पण, आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नांदेड विमानतळावर सेवांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या एक-दोन दिवसांपासून येथे विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

जिल्ह्यावर नुकत्याच ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या जखमा अजूनही भरून न आल्याच असताना नांदेडकरांवर आणखी एक मोठा आघात ओढवला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नांदेड विमानतळावर सेवांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याने शुक्रवारीपासून येथे विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या विकासस्वप्नांना तात्पुरता ब्रेक लागला असून प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

नांदेड विमानतळावर धावपट्टीची अवस्था धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्याच्या कारणावरून विमान महासंचालयाने ही कारवाई केली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या पत्रावरून तातडीने आदेश जारी झाले. परिणामी शक्रवारी सकाळी नांदेडहून दिल्लीजवळच्या आदमपूरकडे जाणारे विमान थांबविण्यात आले. आधीच आरक्षण केलेले प्रवासी विमानतळावर पोहोचले असतानाच ही धक्कादायक माहिती त्यांना मिळाली.

पर्यटनाच्या संधींसाठी हवाई सेवा आवश्यक

नांदेडसारख्या सीमाभागातील जिल्ह्याला उद्योग, गुंतवणूक आणि पर्यटनाच्या संधींसाठी हवाई सेवा आवश्यक आहे. पण विमानतळाच्या देखभालीकडे कायमच अनास्थेने पाहिले गेले. राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्क्रयतेमुळे विमानतळ बंद होण्याची वेळ आहे. यामुळे प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे

मराठवाड्याच्या प्रगतीला मिळाली असती गती

मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांशी नांदेडला जोडणाऱ्या सेवा सुरू झाल्याने मराठवाड्याच्या प्रगतीला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे भाडेतत्त्वावर संचालन दिल्यानंतर ही कंपनी दिवाळखोरीत गेली. नंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ताबा घेऊन एका कंपनीला दिला.

पुढील वाटचाल अनिश्चित

सध्या स्टार एअरलाइन्स दिल्ली, बंगळुरू, पुणे, हैदराबाद अशी उडान अंतर्गत सेवा सुरू होती. या सेवांचे थांबणे म्हणजे नांदेडकरांच्या पायाखालची वाळू सरकल्यासारखी परिस्थिती झाली आहे. व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण तसेच नोकरदार वर्गाला प्रचंड फटका बसला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विमानतळ बंदीबाबत मुख्यमंत्री आणि शासनाशी संपर्क साधला असल्याचे सांगितले.

Web Title: Nanded airport decides to suspend services indefinitely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • nanded news

संबंधित बातम्या

पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्…
1

पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्…

Nanded News: पत्नीच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, ११२ वर अर्धा तास पोलिसांशी बोलला आणि…
2

Nanded News: पत्नीच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, ११२ वर अर्धा तास पोलिसांशी बोलला आणि…

Nanded News: नांदेडमध्ये भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू; उभ्या असलेल्या ट्रकला कारने दिली धडक
3

Nanded News: नांदेडमध्ये भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू; उभ्या असलेल्या ट्रकला कारने दिली धडक

मोठी बातमी! पुणे-नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित; कारण काय तर, धावपट्टीवर…
4

मोठी बातमी! पुणे-नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित; कारण काय तर, धावपट्टीवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.