Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Private coaching classes Scam : ९,९५० विद्यार्थ्यांची दिशाभूल अन् केवळ ५० जणांच्या यशावर कोट्यवधींची उलाढाल

काही क्लासेसकडून जेईई किया नीटमध्ये यशस्वी झालेल्या इतर संस्थांतील विद्यार्थ्यांना मोठ्या रकमांचे आमिष दाखवून 'हे विद्यार्थी आमच्या क्लासचे होते' अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या जात असत्याचाही आरोप करण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 21, 2026 | 06:15 PM
Nanded private coaching classes

Nanded private coaching classes

Follow Us
Follow Us:

Private coaching classes Scam:  राज्यातील खासगी नीट आणि जेईई कोचिंग क्लासेसच्या वाढत्या व्यावसायिकीकरणाविरोधात पालक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून ‘सर्व खासगी क्लासेस बंद झाले पाहिजेत’ अशी मागणी जोर धरू लागली आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत केवळ निवडक विद्यार्थ्यांच्या हजार यशाच्या जोरावर कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पालकांनी मांडलेल्या मुद्दयांनुसार, सुमारे १० विद्यार्थ्यांमधून केवळ ५० विद्यार्थी नीट किवा जेईईमध्ये यशस्वी होतात, म्हणजेच यशाचे प्रमाण १ टक्क्यांपेक्षाही कमी असताना याच ५० विद्यार्थ्यांच्या फोटो आणि जाहिराती करून उर्वरित ९ हजार ९५० विद्यार्थी व त्यांच्या पालकांची दिशाभूल केली जाते, असा आरोप आहे. तसेच दहावी बोर्ड परीक्षेत ५० ते ६० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध मार्गांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे चित्र निर्माण करून पालकांना डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची मोठी स्वप्ने दाखवली जातात, त्यानंतर लाखो रुपयांची फी आकारून प्रवेश घेतला जातो.

IMF Warns India: तेल बिघडवणार भारताचं सगळं आर्थिक गणित, IMF ने सांगितलं, आता नेमकं काय करायचं

हे विद्यार्थी तर आमचे

काही क्लासेसकडून जेईई किया नीटमध्ये यशस्वी झालेल्या इतर संस्थांतील विद्यार्थ्यांना मोठ्या रकमांचे आमिष दाखवून ‘हे विद्यार्थी आमच्या क्लासचे होते’ अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या जात असत्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. डेमो चलासदरम्यान नामांकित प्राध्यापक शिकवतात, मात्र प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिनाभरातच शिक्षक बदलले जातात, अशीही गंभीर तक्रार पुढे आली अहे. तसेच १० हजार विद्याश्यांपैकी केवळ २५ से ५० हुशार विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैंच करून त्यांनाच सर्व सुविधा दिल्या जातात. तर उर्वरित हज्जारी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असेही सांगण्यात आले.

याशिवाय काही क्लासेसकडून पालकांची आर्थिक परिस्थिती पाहून ‘गैस पेपर’ ‘विशेष मार्गदर्शन’ किंवा ‘गुप्त तयारी साहित्य यांच्या नावाखाली लाखो रुपयांची अतिरिक्त वसुली केली जात असल्याचा आरोप आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्त फी असलेल्या विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास भाग पाडून संबंधित संस्थांकडून कमिशन घेतले जात असल्याचाही दावा करण्यात आला. ‘मुलगा हुशार आहे पण अभ्यास करत नाही’, ‘आता थोडेथोडके मार्क वाढत आहेत, ‘मित्रांमुळे मागे पडला आहे’ अशी कारणे सांगून पालकांना मानसिकदृष्ट्या गुंतवून ठेवले जाते आणि फी वसूल केली जाते, अशी नाराजीही व्यक्त होत आहे.

Ebola व्हायरसबाबत केंद्र सरकार सतर्क! देशातील सर्व विमानतळ आणि बंदरांवर ‘स्क्रीनिंग’ सुरू; कडक निर्देश जारी

दरम्यान, मोठमोठ्या जाहिराती, पेड न्यूज आणि खोट्या प्रसिद्धीच्या माध्यमातून पालकाना आकर्षित केले जात असल्याचे सांगण्यात आले. अनेक पालक मुलाच्या भविष्यासाठी घर, शेती विकून किया कर्ज काढून लाखो रुपयांची फी भरतात.

 

Web Title: Nanded private coaching classes protest commercialization of education nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 06:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.