उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का; बड्या नेत्याने हाती बांधलं घड्याळ
नांदेड: ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश करून चोवीस तास उलटत नाहीत तोच ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. शिंदे गटाने ‘टायगर ऑपरेशन’ सक्रिय केले असून, भाजपमध्येही नेत्यांच्या पक्षप्रवेशाला वेग आला आहे. अशा परिस्थितीत ठाकरे गटाला आणखी एक मोठा झटका बसला आहे, कारण नांदेडमधील दोन महत्त्वाचे नेते त्यांनी साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नांदेडमध्ये ठाकरे गटाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दत्ता पाटील कोकाटे आणि एकनाथ पवार यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा दणका बसल्याचे मानले जात आहे.
वाळू माफीयांचे धाबे दणाणले; अवैध वाळू उपसा करणाऱ्या तब्बल 13 बोटी नष्ट
कोकणात उद्धवसेनेला पुन्हा हादरा
रत्नागिरीत ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान ठाकरे गटाच्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. उद्या दुपारी २.३० वाजता एकनाथ शिंदे यांची चंपक मैदानावर जाहीर सभा होणार असून, याच सभेत माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
रत्नागिरीत ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बनेदेखील उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने सभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. या पक्षप्रवेशानंतर रत्नागिरीत एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे, कारण किरण सामंत, उदय सामंत आणि राजन साळवी हे तिघे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे या सभेला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
Maharashtra Politics: महाविकास आघाडीतील दरी वाढली? संजय राऊत- जितेंद्र आव्हाड आमनेसामने
राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे निष्ठावंत मानले जात असणाऱ्या राजन साळवी यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. राजन साळवी यांनी काल (दि.12) ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या.